काही लोक खूपच साधेभोळे असतात. आपण कोणासमोर काय बोलत आहोत, हेही ते विसरतात. त्याचे झाले असे की, स्वभावाने भोळे असलेल्या एका शिक्षकाच्या वर्गात अचानकपने ‘स्कॉड’ची टीम भेट देते आणि वर्गातील विद्यार्थ्यांकडून ‘कॉपी’ जमा करते.
स्कॉडमध्ये सहभागी अधिकारी संपूर्ण वर्ग तपासतात. त्यात बहुतेक विद्यार्थ्यांकडे कॉपी आढळते. या सर्व विद्यार्थ्यांची नावे ते लिहून घेतात. त्यामुळे वर्ग शिक्षकाला ‘टराऽऽऽटरा’ घाम फुटतो. इतक्यात एक महिला त्यांच्या वर्गासमोरून जाताना दिसते. हे शिक्षक महोदय यांना आवाज देवून थांबवतात आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगतात.
आता माझ्यावर काही कारवाई तर होणार नाही ना, अशी भीती त्यांच्या मनात असते. पण ज्या बाईंसमोर ही ‘आपबिती’ सांगतात, त्या बाईदेखील ‘स्कॉड’च्या टीममध्येच सहभागी असल्याचे त्यांना थोड्यावेळाने समजते अन् त्यांची पाचावर धारण बसते. (SAKAL Special chalta bolta marathi news)
रस्त्यात दगड, की डोक्यात दगड
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी रविवारी नाशिक उपकेंद्राला भेट देत पाहणी केली. या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने सिमेंट, विटा, गज आणि इतर बांधकाम साहित्य पडलेले होते. त्यामुळेच की काय या भेटीदरम्यान झालेली चर्चा, मनोगतात ‘दगड’ कुतूहलाचा विषय ठरला. याआधीच उपकेंद्राच्या विषयावर वाद-विवाद होत राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर याभेटीदरम्यान दोन्ही बाजूंनी टोमण्यांचा भरपूर पाऊस पडला. अमुक व्यक्तीने रस्त्यात दगड ठेवला असावा, म्हणून सांभाळून चालण्याचा सल्ला एका अधिकाऱ्याने दिला. तर आपण रस्त्यात दगड नाही, तर डोक्यात दगड घालतो, असं प्रतिउत्तर संबंधितांनं दिलं. या जुगलबंदीने मात्र उपस्थितांचे निखळ मनोरंजन केले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.