nashik adivasi morcha  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...! आंदोलनाचा फटका

SAKAL Special : वनजमिनींच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

आंदोलनाचा फटका

वनजमिनींच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तोडगा न निघाल्याने आंदोलनकर्त्यांचे ठिय्या आंदोलन कायम आहे. हे आंदोलन स्मार्ट रोडवर सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

रस्ता बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज विविध बैठका होतात. शासकीय योजनांच्या आढाव्यासाठी बैठकीस जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारीही दाखल झाले. मात्र, रस्ता बंद असल्याने त्यांना पायपीट झाली.

त्यावर एका अधिकाऱ्याने थेट एका राजकीय नेत्यास फोन लावला. यात संबंधित अधिकाऱ्याने आंदोलन मिटवा लवकर... अहो, आमचे हाल होत आहेत. आंदोलनामुळे गाडी कुठे लावावी लागली, बरेच अंतर पायपीट करावी लागली असल्याची व्यथा मांडली. त्यावर समोरून केवळ हो... हो... उत्तर आले.

(SAKAL Special chalta bolta impact of movement marathi news)

कार्यक्रम माझाच आहे

सांस्कृतिक कार्यक्रमांची वेळ ही सायंकाळची असेल तर रसिक श्रोत्यांना सोयीचे ठरते. पण, दुपारच्या वेळी एखादा कार्यक्रम आयोजित केला आणि तोही नेहमीच्या ठिकाणांपेक्षा आडवळणी मार्गावर असेल तर जाणे जरा अवघडच होते.

अशाच एका महाकार्यक्रमासाठी शहरातील उच्चाधिकारी उपस्थित होते. अगोदरच फार वेळ झालेला असल्याने अधिकाऱ्यांना निघण्याची घाई. त्यात एक व्यक्ती त्यांच्याशेजारी येऊन बसते. त्याला हे ‘तुम्ही कोण’ म्हणून विचारतात.

लवकरच आवरा तुमचा प्रोग्राम, आम्हाला पुढे निघायला वेळ होत असल्याची त्याला सूचना देतात. ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात तो माझाच आहे, असे त्या कलाकाराने सांगितल्यावर अधिकाऱ्यांचा हिरमोडच झाला. (latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT