narendra modi  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता...बोलता...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा झाला. ओझर विमानतळावर प्रोटोकॉलनुसार ठराविक लोकांना स्वागत करण्याची संधी मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

मोदी माझ्याशी विकासावर बोलले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा झाला. ओझर विमानतळावर प्रोटोकॉलनुसार ठराविक लोकांना स्वागत करण्याची संधी मिळाली. त्याव्यतिरिक्त निलगिरीबाग येथील हेलिपॅडवर काहींनी संधी मिळाली तर उर्वरित पदाधिकाऱ्यांना सभास्थळी नमस्कार करण्याची संधी मिळाली.

मोदी त्यांच्या खास विमानातून उतरल्यानंतर फक्त हात जोडून सर्वांचे अभिवादन स्वीकारत होते. काही ठिकाणी थांबले त्या काळात अनेकांनी फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केले. आज दिवसभर मोदी माझ्याशी बोलले यावरच अधिक चर्चा घडून आली.

काय बोलले तर विकासावर... देशाचे पंतप्रधान असल्याने प्रत्येकाला भेटीचा अभिमान राहिलंच यात शंका नाही परंतु ‘मोदी माझ्याशी विकासावर बोलले’ यात जरा अतिशयोक्ती वाटतं असल्याने अनेकांनी आपले हसू करून घेतले.

(sakal special chalta bolta Modi spoke to me on development nashik news)

‘त्यांनी’ होर्डिंग पाहिले, आता तिकीट फिक्स

केंद्रीय क्रीडा मंत्रालयांतर्गत २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक शहरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन झाले तसेच त्यांनी रामतीर्थावर गंगापूजन केले. काळाराम मंदिरातही पूजा केली. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त इच्छुकांनी होर्डिंगच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

पंचवटी, तपोवन, रामघाट यांसह शहरातील विविध भागांत इच्छुकांनी स्वागताचे होर्डिंग लावले होते. या होर्डिंगची चांगलची चर्चा सुरू होती. झाले असे की, रोड शोदरम्यान दोन युवक होर्डिंगकडे बघून चर्चा करीत होते. यात एका युवकाने यार, लई होर्डिंग लावले स्वागताचे.

जागोजागी नुसतेच स्वागत.... यावर दुसऱ्याने सर्व होर्डिंग पंतप्रधान मोदी यांनी पाहिले की राव... आता यांचे तिकीट ‘फिक्स’ झाले, निवडून आलेच म्हणून समज... असे सांगत, दोघे रस्त्याने चालते झाले.

आयुष्याचे सार्थक झाले

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात अनेकांना त्यांनी हात जोडून नमस्कार केला. काही ठिकाणी थांबले त्या काळात अनेकांनी फोटो काढून घेतले. देशाचे पंतप्रधान त्यातही लोकप्रियता शिगेला पोहोचलेल्या व्यक्तीसोबत फोटो काढण्याची संधी म्हणजे अनेकांना आयुष्याचे सार्थकच वाटले. त्यामुळे शनिवारी दिवसभर आयुष्य सार्थकी लागल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची संधी अनेकांनी साधली.

कोणाचा पत्ता कट?

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात त्यांचे स्वागत करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची यादी जाहीर झाली. ओझर विमानतळावर एकूण ३८ पदाधिकाऱ्यांना मोदी यांना सन्मानित करण्यासाठी यादी तयार करण्यात आली होती.

परंतु ऐनवेळी भाजप व राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांची नावे यादीतून गायब झाल्याने नावे गायब करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. भाजपचे चार व राष्ट्रवादीच्या चौघांना यादीत वगळण्यात आले. वास्तविक पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांना स्वागतासाठी निमंत्रित करणे क्रमप्राप्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

SCROLL FOR NEXT