SAKAL Special chalta bolta nashik political satire comedy tragedy news Loksabha Election 
नाशिक

SAKAL Special: चालता- बोलता

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

माझेही इच्छुकांमध्ये नाव आहे...

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली. त्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या असून, इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. काही जण तर, उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

झाले असे, की एका राजकीय पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर नुकतीच बैठक झाली. बैठकीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करीत मतदारसंघावर दावा केला गेला. यात नाशिक लोकसभा मतदारसंघावर एका फुटलेल्या पक्षाच्या गटाने बैठकीत दावा ठोकून टाकला. बैठकीतील चर्चेला तपशील हा बाहेर गेला नाही.

मात्र, एका हौशी कार्यकर्त्याने लागलीच दुसऱ्या कार्यकर्त्याला फोन करून बैठक झाल्याचे सांगत सारा वृत्तांत सांगितला. बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा झाल्याचे सांगायला विसरला नाही. यात माझेही नाव असल्याचे हळूच त्या कार्यकर्त्याने त्यास सांगितले. त्यावर समोरील कार्यकर्त्याने लागलीच अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या. (SAKAL Special chalta bolta nashik political satire comedy tragedy news)

कथित आमदाराला ‘स्मार्टवॉच’चे वेड

समाजातील अनेकांना नेतेगिरी करण्याची सवय असते. त्यामुळे त्याला आमदारच म्हणायचे. या कथित आमदाराचा बर्थ डे होता. त्यामुळे भाऊ एकदम खुशीत होते. कार्यालयात आले ते एकदम आमदाराच्याच ‘स्टाइल’मध्ये. पांढऱ्या खादीचे कपडे. विशेष म्हणजे आतला बनियनही नवीन घेतला त्यासाठी. पायात काळे चकचकीत बूट.

कार्यालयात साऱ्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. बर्थ डेच्या शुभेच्छा दिल्या. त्या वेळी एकाने या कथिक आमदाराला जरा बाजूला घेत, भाऊ ‘एन्ट्री’ झकास झाली. पण, हातातलं घड्याळही नवं असतं तर जोरदार झालं असतं पाहा... मग काय. सांगणाऱ्यालाच गाडीवर बसवलं अन्‌ दुकान गाठलं. डायलच्या घड्याळापासून पाहत-पाहत महागडं स्मार्टवॉच फायनल झालं. त्या स्मार्टवॉचचे सगळे ॲप्लिकेशन्स समजून घेतले.

आमदार भाऊ खुशीतच कार्यालयात. बर्थ डे असल्याने शुभेच्छांचे फोन सुरूच होते. आता ते स्मार्टवॉचवर येत होते. या स्मार्टवॉचला स्पीकरही असल्याने आलेल्या फोनवर ते साऱ्यांसमोर बोलत होते. आला फोन की तोंडापुढे मनगट, आला फोन की तोंडापुढे मनगट..! तेही अगदी खुशीत समोरच्याचे शुभेच्छा संदेश स्वीकारत होते. एकजण म्हणालाच, अरे कोणी याला हा नाद लावलाय. सारखं-सारखं बोलायला मनगटाचं घड्याळ तोंडासमोर घेतोय... रात्रीही तसाच झोपायचा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT