दादा मला वाचवा...!
ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना नाशिक शहरात त्यांचे संगीत विद्यालय उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी जमिनीची खरेदीही केली होती. मात्र या व्यवहारात त्यांची फसवणूक झाली.
बुधवारी (ता. ४) सुरेश वाडकर यांच्या जीवनगौरव पुरस्कारानिमित्त वाडकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर वाडकरांनी आपल्या मनोगतातून ही आपबिती दादांपुढे मांडली अन् त्यांच्या विद्यालयाच्या निर्माणातील अडथळा दूर करण्यासाठी दादा मला वाचवा, अशी आर्जव देखील केली. (SAKAL Special comedy tragedy political satire suresh wadkar ajit pawar bjp congress nashik news)
राजकारणात काही खरं नाही
गत पाच वर्षांत राज्यातील राजकारणात नको त्या युती, आघाड्या झाल्या. यात सत्तेसाठी निवडून आलेले पक्ष नको त्या पक्षांसोबत गेले. यातच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांमध्ये फूट फडली अन् आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले.
त्यामुळे राजकारणाबाबत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया फारशा चांगल्या नाहीत. तर झाले असे, की जिल्हा परिषदेत दोन कार्यकर्त्यांमध्ये राजकारणावर चर्चा सुरू होती. यात काय होईल मतदारसंघात अशी विचारणा एकाने केली.
त्यावर, सध्या तरी, भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होईल, असे चित्र आहे. मात्र, निवडणुकीपर्यंत काहीही होऊ शकते, असे दुसऱ्या कार्यकर्त्यांने सांगत, राजकारणात काही खरं राहिलेले नाही. त्यामुळे कधी काय होईल ते सांगत येत नाही, असे सांगत चर्चेतून काढता पाय घेतला.
गॅदरिंगमध्ये गदारोळ
काही विद्यार्थी फार खोडकर असतात. खोड्या काढण्यातच त्यांचा दिवस जातो. यामुळे शिक्षक तर त्यांच्यावर रागवतातच शिवाय इतर वर्गातील विद्यार्थीही त्यांच्यापासून दुरावतात. त्याचे झाले असे की, एका शाळेत गॅदरिंग होणार आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी एक गाणे बसवले. त्यात एकूण आठ विद्यार्थिनींची आवश्यकता होती. पण आपल्या वर्गात तर सातच विद्यार्थिनी असल्याने आता कोणाला घ्यायचे म्हणून शोध सुरू होतो. नाही, हो करत शेवटी आठवीची एक मुलगी त्यांच्या ग्रुपमध्ये येण्यास तयार होते.
तिला ग्रुपमध्ये घेतले म्हणून आठवीचा वर्ग तिच्याशी बोलणे बंद करतो. त्यामुळे ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गॅदरिंगमध्ये काय गदारोळ होईल, काय माहीत.
अजितदादांच्या उठा-बशा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी आयोजकांतर्फे मान्यवरांना प्रत्येक पुरस्करार्थीला पुरस्कार प्रदान करताना उभं राहावं लागत होतं.
असे एकूण १२ पुरस्कारार्थी असल्याने अजितदादांची चांगलीच उठबस झाली. शेवटी आपल्या भाषणातून ते आयोजकांवर बरसलेच. दादा म्हणाले, की माझ्या शाळेनंतर आजच मी एवढ्यांदा उठाबशा काढल्या असतील. त्यामुळे पुढच्यावेळी असे पुरस्कार देताना एकदाच काय ते उरकून घ्या...
दिनदर्शिका रस्त्यावर
नवीन वर्ष सुरू झाले, नाशिक रोड भागात माजी नगरसेवक, भावी, इच्छुक नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी सहापानी नवीन वर्षाची दिनदर्शिका छापून आपल्या प्रभागात वाटल्या.
परंतु या दिनदर्शिकेत रोजच्या दिनक्रमामध्ये अपूर्ण माहिती असल्याने केवळ तिथी व तारखेसाठी का, ही दिनदर्शिका लावायची. या दिनदर्शिकामध्ये मोठे फोटो, माजी नगरसेवक, भावी, इच्छुक नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक जाहिरात असल्याने सकाळी उठून यांचे फोटो बघायचे का म्हणून अनेक घरातील कुटुंबांनी दिनदर्शिकांना केराची टोपली दाखविली.
प्रभाग क्रमांक १९ मध्ये भागात या दिनदर्शिका रस्त्यवर पडलेल्या, कचऱ्याच्या ठिकाणी आढळून आल्या. ज्या उद्देशानाने या दिनदर्शिका वाटण्यात आल्या, तो उद्देश साध्य होताना दिसत नाही.
या दिनदर्शिकांमध्ये महापुरुष यांची जयंती व त्याची माहिती, पारंपरिक सण, गावोगावीच्या यात्रा-जत्रा यांची माहिती असती तर नागरिकांनी त्या सांभाळून ठेवल्या असता. पण केवळ स्वतःचे फोटो छापून वीस-तीस रुपयांच्या दिनदर्शिका वाटणाऱ्या इच्छुकांना नागरिक नाकारत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.