Maratha Reservation esakal
नाशिक

SAKAL Special: चालता... बोलता...

सकाळ वृत्तसेवा

...हे आंदोलन जरा वेगळंय!

स्थळ : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, वेळ सूर्योदयाची... सकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक मंडळी वॉकसाठी घराबाहेर निघाली. मॉर्निंग वॉक करताना त्यांच्यात राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर गंभीर चर्चा रंगली होती.

त्यात एक आजोबा म्हणाले, आपण इतक्या वर्षांत कितीतरी आंदोलनं पाहिली; पण मराठा आरक्षणाच हे आंदोलन जरा वेगळंच आहे. त्यावर दुसरे आजोबा लगेच उत्तरले, हो ना खरंय! आधी राजकीय पक्ष अन् त्यांचे कार्यकर्ते आंदोलनं करायचे आणि सामान्यांना वेठीस धरायचे.

मात्र हे आंदोलन सामान्य नागरिकांनी करत राजकीय पक्षांनाच वेठीस धरलंय. आता पाहू, नेते व त्यांचे पक्ष आणि कार्यकर्ते काय करतात ते, असं म्हणत ज्येष्ठ नागरिक मंडळींनी आपला मॉर्निंग वॉक पूर्ण करत घरचा रस्ता धरला. (sakal special corner chalta bolta on Maratha Reseravtion andolan case nashik)

माझं सलग निवडून येणं त्याला विशेष वाटलं!

एका व्याख्यानमालेनिमित्त लोकसभेच्या माजी अध्यक्षा व लेखिका सुमित्रा महाजन शहरात आल्या होत्या. त्यांचे व्याख्यान होणार, त्यापूर्वी निवेदकाने त्यांचा परिचय श्रोत्यांना करून देताना सांगितले, की सुमित्रा महाजन या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात सलग आठ वेळा निवडून आल्या आहेत.

या प्रसंगावर सुमित्रा महाजन म्हणाल्या, की काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमावेळी माझा असाच परिचय एका तरुण निवेदकाने करून दिला होता. तेव्हाही त्याने मी सलग आठ वेळा निवडून आल्याचं श्रोत्यांना सांगितलं.

पण, पुढे तो म्हणाला, की यात विशेष हे आहे की मॅडम एकाच पक्षातून निवडून आल्या आहेत. म्हणजे पाहा, माझ्या एकनिष्ठतेच त्या तरुणाला नवल वाटलं. त्यांच्या या वाक्याने संपूर्ण सभागृहात हशा पिकला...

मधुमेहाचा असाही उपाय

मधुमेह म्हटले, की रक्तात जमा झालेली साखर कमी करण्याचे अनेक उपाय योजले जातात. चालणे, सायकलिंग किंवा पोहणे हे त्यातले त्यात चांगले उपाय. एका महाशयाला मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना चालण्याचा सल्ला दिला.

परंतु, सकाळी उठण्याचा कंटाळा येत असल्याने या महाशयाने रक्तातील साखर कमी करण्यासाठी अंगावर चार ब्लॅंकेट घेऊन झोपण्याचा दिनक्रम सुरू केला आहे. सध्या थंडीची चाहूल लागली.

त्यामुळे तासभर अंगावर पांघरून असले तरी गरम होऊन अंथरून दूर फेकले जाते. परंतु, गरम होईल, त्यातून घाम सुटेल. घाम सुटला, की त्यातून साखर आपोआप बाहेर पडेल, असा तर्क लावत एकाचा हा अघोरी उपाय पाहून डॉक्टरांना हसावे की रडावे, असे झाले.

बरं, फोन द्या मग इकडे...

अगदी चहाची टपरी असेल किंवा नामांकित कंपन्‍यांचे दालन... हल्‍ली सगळीकडे क्‍यूआर कोडद्वारे यूपीआय पेमेंटने पैसे अदा करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. पण या पेमेंटच्‍या प्रक्रियेतील गं‍मत काही ठिकाणीच घडते.

असाच एक विनोदी किस्सा एका रुग्‍णालयात घडला. रिसेप्‍शनिस्‍टने रुग्‍णाच्‍या नातेवाइकाचा फोन त्‍यांचा आधारकार्ड अन्‌ इतर माहिती संगणकात नोंदणी करण्यासाठी हातात घेतला होता. संपूर्ण माहिती दाखल केल्‍यानंतर रिसेप्‍शनिस्‍टने फी भरण्यास सांगितले.

रुग्‍णाच्‍या महिला नातेवाईक तडक्‍यात म्‍हणाल्या, ‘‘बरं, फोन द्या मग इकडे.’’ त्‍यावर रिसेप्‍शनिस्‍ट म्‍हणाल्‍या, ‘‘फोन-पे करताय का, तशी एंट्री करायला.’’ त्‍यावर महिलांनी नकार दिला. फोन तर मागितला; पण ऑनलाइन पे करणार नाही, असा संभ्रम रिसेप्‍शनिस्‍टसह रांगेत उभ्या सर्वांनाच पडला.

इतक्‍यात महिलेने मोबाईल हातात घेत कव्‍हर काढले. कुणाला काही उमजेना... कव्‍हरच्‍या मागे ठेवलेले पैसे काढत त्‍या हसत म्‍हणाल्‍या, ‘‘फोन-पे नाही, फोनमध्ये पैसे आहेत, हे पाहताच उपस्‍थित सर्वांमध्ये हशा‍ पिकला अन्‌ डॉक्‍टरांच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाइकांमध्ये हॉस्‍पिटलमध्ये असलेले धीर गंभीर वातावरण काहीसे हलके झाले.

मी २१ वर्षांनी बाप होईल

काही मुले खूप वात्रट असतात. त्यातल्या त्यात शाळेतील मुलांचे अफलातून किस्से, तर विचारायलाच नको. तर झाले असे, की एक दिवस परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न आला, की लहान मुलांची लक्षणे काय, एका डोकेबाज विद्यार्थ्याने या प्रश्नाचे उत्तर थेट शिक्षकालाच विचारले.

पण प्रश्नाचे उत्तर कसे सांगायचे, म्हणून हे गुरुजी हा प्रश्नच टाळायचा म्हणून म्हणतात, ‘बाळा तू बाप झाला, की तुला कळेल लहान मुलांची लक्षणे काय असतात ते’ या खोचक उत्तराला विद्यार्थ्यानेही अफलातून उत्तर दिले, ‘पण सर मला बाप व्हायला अजून २१ वर्षे नऊ महिने आहेत.

तोपर्यंत या प्रश्नाचे काय करू’ वात्रट विद्यार्थ्याचे उत्तर ऐकूण शिक्षकाचीच कोंडी झाली, आता बोला!

मुंबईपेक्षा मतदारसंघाकडे लक्ष असू द्या

राज्यात पक्षफुटीनंतर आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून चर्चेत आलेले जिल्ह्यातील एक आमदार महोदय राज्याच चांगलेच चर्चेत आले. परदेश दौऱ्यातील त्यांचे किस्से असो, की दिल्ली दौऱ्यातील पेहराव यामुळे हे आमदार राज्यभर भलतेच जोमात आले आहे.

त्यांच्यावर विधानसभेची धुरा असल्याकारणाने हल्ली ते मतदारसंघापेक्षा मुंबईत जास्त व्यस्त असतात. मतदारसंघात नसल्याने सामान्य कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत होते. मात्र, त्यावर बोलणार कोण हा मोठा प्रश्न. बोलावयास गेल्यास आपणच वाईट होऊ.

यामुळे हे बोलण्याचे उघड धाडस कोणी त्यांच्यापुढे करीत नाही. परंतु, त्यांचे ज्येष्ठ अन मतदारसंघातील श्रेष्ठ असलेले नेते यांनी या आमदार महोदयास भेटीत चांगलेच बोलून घेतले. अहो, तुम्हाला मतदारसंघाने निवडून दिले आहे, राज्याने नाही.

आगामी निवडणुकीतही तुम्हाला राज्यातून नाही, तर मतदारसंघातून निवडून जायचे आहे. तेव्हा मुंबईत राहण्यापेक्षा मतदारसंघात थांबत जा, इकडेही लक्ष द्या, असे सांगितले. श्रेष्ठ असलेल्या या नेत्याने कान टोचल्यावर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनाही हायसे वाटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT