Narhari Zirwal Esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...!

सकाळ वृत्तसेवा

अशीही लपवाछपवी

‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ हा विनोदी चित्रपट तुम्हाला आठवत असेल. त्यातील पुढारी भारी नक्कल करतात. अशाच स्वरूपाची नक्कल करून नाशिकचे टोपीवाले आमदार सर्वांना हसायला लावतात.

त्याचे झाले असे, की कलेक्टर ऑफिसमध्ये एका मीटिंगनिमित्त आलेल्या झिरवाळांना या मीटिंगविषयी माहितीपत्रक देण्यात आले. त्यात नेमकी त्यांच्याच मतदारसंघाची माहिती अपूर्ण होती. त्यांनी ती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

अधिकाऱ्यांची लपवाछपवी उघड झाल्यानंतर लागलीच त्यांना सुधारित माहिती दाखविण्यात आली. मग आमदार महोदय भडकले, आम्हाला ही माहिती कशाला दिली. आमच्यासमोर सुधारित माहिती ठेवली असती तर आम्ही ती पूर्ण वाचली असती.

मी संपूर्ण रामायण वाचतो, त्यामुळे मला हे वाचायला काहीच वेळ लागला नसता, मिश्‍कील शब्दांत असा टोमणाही त्यांनी मारला. (SAKAL Special humour tragedy comedy political satire IB raid imperial blue nashik)

‘आयबी’ची ‘रेड’ पडते, तेव्हा...

इडी (इन्फोर्समेंट डिपार्टमेंट), आयबी (इंटेलिजन्स ब्यूरो), आयटी (इन्कम टॅक्स) ही नावे ऐकली, की विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षालाही धडकी भरते.

अशीच एक ‘रेड’ नाशिकमध्ये पडली, ती होती ‘आयबी’ची. एका प्रथितयश व्यक्तीच्या घरावर ‘आयबी’ची ‘रेड’ पडल्याची वार्ता मित्रांना समजल्यावर धावपळ उडाली. मोबाईल ‘स्विच ऑफ’, घरचे काही बोलायला तयार नाहीत.

आता काय करायचे, याचा विचार गतीने सुरू झाला. ‘आयबी’ने अटक केल्यावर पुढे करायचे काय, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जामीन मिळेल की नाही, येथपर्यंत चर्चा झाली.

वकील तयार झाला; परंतु जोपर्यंत ‘आयबी’ची ‘रे’ड ज्याच्या घरी पडली, ती व्यक्ती समोर भेटत नाही, तोपर्यंत काहीच ‘ॲक्शन’ घ्यायची नाही, असा निर्णय पक्का झाला.

थोड्या वेळाने संबंधिताचा फोन सुरू झाल्यावर त्याला विचारणा झाली, ‘‘अरे, तुझ्याकडे ‘रेड’ पडली ना, काय व कसे झाले,’’ अशी विचारपूस झाली. अखेरीस संबंधिताने सविस्तर वर्णन करताना चर्चा करणाऱ्यांना मूर्ख ठरविले.

‘आयबी’ची ‘रेड’ पडली; परंतु त्या ‘आयबी’ची नव्हे, तर एम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्कीची असा खुलासा केल्यावर चर्चा करणाऱ्यांचा संताप अनावर झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT