Crime news  esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: गृहकर्ज असताना फ्लॅटची विक्री; 45 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : फ्लॅट गृहकर्जापोटी बँकेकडे गहाण असताना संशयितांनी संगनमताने विक्री केली.

यादरम्यान, संबंधितांचे गृहकर्जाचे काही हप्ते थकल्यानंतर थेट बँकेकडून जप्तीचीच नोटीस आली असता, त्या फ्लॅटवर पूर्वीचेच गृहकर्ज असल्याचे समोर आल्याने संशयितांनी संबंधितांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी संशयित पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sale of flat while taking home loan 45 lakh fraud Nashik Fraud Crime)

विजय प्रल्हाद रेलवानी (रा. जुहू, मुंबई), पूजा विजय रेलवानी, जयश्री प्रल्हाद रेलानी (सर्व रा. जुहू, मुंबई), राजेंद्र विजय पाटील, मीनाक्षी विजय पाटील अशी संशयितांची नावे आहेत. हिराजी श्रीपत नंदन (रा. इकोसिटी, पाथर्डी शिवार) या ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादीनुसार, त्यांनी संशयितांकडून २०१३ मध्ये फ्लॅट खरेदी केला होता.

परंतु संशयितांनी त्या वेळी या फ्लॅटवर गृहकर्ज असल्याचे दडवून ठेवले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचा गृहकर्जाचा हप्ता थकला होता. त्याबाबत आयसीआयसीआय बँकेने सदर फ्लॅटसंदर्भात जप्तीची नोटीस बजावली. त्यावेळी नंदन यांना धक्का बसला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत त्यांनी चौकशी केली असता, सदर फ्लॅटवर त्यांनी खरेदी करण्यापूर्वीच त्यावर गृहकर्जापोटी बँकेकडे गहाण होते. याबाबत संशयितांनी त्यांच्यापासून सदर माहिती दडवून ठेवत दुय्यम निबंधकांकडे खरेदीचा व्यवहार केला होता.

यापोटी संशयितांनी नंदन यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी नंदन यांनी मुंबई नाका पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक मन्सूरी हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT