Nathjal Water Bottle esakal
नाशिक

MSRTC Nathjal: STच्या 'नाथजल'ची वाढीव दराने विक्री; नाशिक रोड बस स्थानकावरील पाणी विक्री स्टॉलचा परवाना रद्द

अजित देसाई

MSRTC NathJal : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी सुरू केलेल्या ' नाथ जल ' या बाटलीबंद पाण्याची निर्धारित किमतीत विक्री न करता वाढीव भावात विक्री करणाऱ्या व त्याबाबत विचारणा करणाऱ्या एसटी प्रवाशांशी असभ्य वर्तवणूक करणाऱ्या नाशिक रोड बस स्थानकावरील स्टॉल प्रतिनिधीचा परवाना रद्द करण्याचे व त्याच्या जागी तात्काळ प्रभावाने नवीन प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचे आदेश एसटीच्या नियोजन आणि पणन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. (Sale of MSRTC Nathjal at enhanced rates License of water stall at Nashik Road bus station cancelled nashik news)

एसटी महामंडळाने 'नाथजल' बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मे .शेळके बिवरेजस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला दिली आहे. कंपनीमार्फत राज्यातील बस स्थानके व आगारांमध्ये पाणी विक्री व साठवणुकीचे स्टॉल उभारण्यात आले असून त्यासाठी एसटीने जागा उपलब्ध करून दिली आहे.

तेथे कंपनीमार्फत परवानाधारक प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी विक्री स्टॉलवर निर्धारित केलेल्या पंधरा रुपये या किमती ऐवजी वीस रुपये दराने एक लिटरची पाण्याची बाटली विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी एसटी प्रवाशांकडून करण्यात येत होत्या.

मात्र स्थानिक एसटी प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते. नाशिक विभागातील नाशिक रोड बस स्थानकावर देखील वाढीव दराने पाणी विक्री होत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता.

एका महिला ग्राहकाने याबाबतची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे व्हायरल केली होती. त्यात 'नाथजल' स्टॉलमध्ये असणारी महिला प्रतिनिधी या प्रवाशाशी अर्वाच्य भाषेत संभाषण करत होती.

ही व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रती जनमानसात असलेली प्रतिमा मलिन होत असल्याचे कारण देत एसटीच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाने नाशिक रोड येथील नाथजल विक्रीचा सदर प्रतिनिधीचापरवाना तातडीने रद्द करण्याची निर्देश मे. शेळके बिवरेजेस या कंपनीला दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदर प्रतिनिधीच्या ताब्यातून स्टॉल रिकामा करून घ्यावा व त्याला तातडीने जागेचा ताबा सोडण्यास सांगावे. तसेच तात्काळ प्रभावाने अन्य प्रतिनिधीची तेथे नियुक्ती करावी असे एसटीच्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी आदेशात नमूद केले आहे.

प्रत्येक तक्रारीत पुरवठादाराला 50 हजार दंड होणार...

नाशिक रोड बस स्थानकातील वाढीव दराने नाथजल बाटलीबंद पाणी विक्री प्रकरणात एसटीने पुरवठादार कंपनीला 50 हजार रुपये दंडाची वसुली का करण्यात येऊ नये याबाबत तात्काळ खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील सर्वच ठिकाणी नाथजलची वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने व याला पूवठादार मे शेळके बिवरजेस कंपनी जबाबदार असल्याचे एसटीच्या आदेशात म्हटले आहे. तसेच राज्यातील इतर बसस्थानकांवरील कंपनीमार्फत नियुक्त विक्री प्रतिनिधींना एसटीच्या नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत समज देण्यात यावी.

अन्यथा या प्रतिनिधीमार्फत यापुढे तक्रारी उद्भवल्यास प्रत्येक तक्रारीस शासन म्हणून 50 हजार रुपये इतका दंड कंपनीमार्फत वसुल करण्यात येईल व विनासबब जागेचा ताबा महामंडळामार्फन घेण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT