azadi ka amrit mohotsav latest marathi news esakal
नाशिक

2 दिवसात साडेतेरा हजार तिरंग्याची विक्री; NMC कर्मचाऱ्यांना खरेदी बंधनकारक

विक्रांत मते

नाशिक : हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये दोन दिवसात १३ हजार ४५८ तिरंगा झेंड्याची विक्री झाली आहे.

नागरिकांना तिरंगा खरेदीसाठी आवाहन करतानाच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील झेंडा खरेदी सक्तीची करण्यात आली आहे. (Sale of thirteen half thousand indian flag in 2 days Purchase Compulsory for NMC Employees Nashik Latest Marathi News)

देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान देशभरात हर घर तिरंगा उपक्रम राबविला जात आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा व क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत नाशिक शहरात प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयामार्फत दोन लाख तिरंगा झेंडे विक्रीचे उद्दिष्ट महापालिकेला देण्यात आले आहे.

त्यानुसार गुरुवार (ता. ४) पासून महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयात तिरंगा झेंडा विक्री सुरू झाली आहे. दोन दिवसात १३ हजार ४५८ झेंडा विक्री झाली. पश्चिम विभागात ५६७६, सातपूर विभागात ३०३३, पंचवटी विभागात २९३३, पूर्व विभागात १४२४, नाशिक रोड विभागात ३३१, तर सिडको विभागात ६१ झेंड्याची विक्री झाली आहे.

महापालिकेच्या ४००० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने ध्वज खरेदी केला की नाही, याची नोंद बंधनकारक करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विविध संघटनांची आज बैठक

हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिका मुख्यालयात शनिवारी (ता. ६) आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली आहे क्रेडाई, नरेडको या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनांसह निमा, आयमा, नाईस, शाळा, महाविद्यालय सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी आयुक्त संवाद साधणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT