Sudhakar Badgujar coming out after police interrogation.  
नाशिक

Sudhakar Badgujar: बडगुजरांसह अन्‍य तिघांची चौकशी; गुन्‍हे शाखेकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Sudhakar Badgujar: मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्‍बस्‍फोटातील संशयित सलीम कुत्ता याच्‍याबरोबर व्‍हायरल नृत्‍याच्‍या व्‍हिडिओनंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई केली. शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी शहर गुन्‍हे शाखेने या प्रकरणात चर्चेत आलेले शिवसेनेचे (ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना ताब्यात घेत चौकशी केली.

इतर तिघांचीही चौकशी करीत सायंकाळी उशिरा सोडण्यात आले. दरम्‍यान, या वेळी कार्यकर्ते, समर्थकांनी गर्दी केली होती. (salim kutta case Investigation of sudhakar Badgujar and other 3 by Crime Branch nashik news)

सकाळी विधानसभेत मांडलेल्‍या या प्रकरणानंतर दिवसभर शहरात पडसाद उमटले. आमदार नीतेश राणे यांनी अधिवेशनात प्रश्‍न उपस्‍थित केल्‍यावर गृह खात्‍याने चौकशीचे निर्देश दिले होते. त्‍यानंतर श्री. बडगुजर यांना सायंकाळी गुन्‍हे शाखेकडून चौकशीसाठी ताब्‍यात घेण्यात आले. ‘एनडीपीएस’ कार्यालयात साधारणतः दोन ते तीन तास चौकशी केली. त्यानंतर सर्वांना सोडण्यात आले.

मटालेसह डीजे चालकाची चौकशी

व्‍हायरल झालेल्‍या व्‍हिडिओत दिसत असलेला श्री. बडगुजर यांचा निकटवर्तीय समजला जाणारा पवन मटाले याच्‍यासह पार्टीतील डीजे चालक सारप्रीत सिंग, ऑर्केस्ट्रा गायक रवी शेट्टी यांचीही चौकशी केली. दरम्‍यान, २०१६ मध्ये संशयित सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर असताना श्री. बडगुजर यांच्या फार्म हाउसमध्ये रात्री झालेल्या पार्टीतील व्हिडिओ असल्‍याचे सांगितले जात आहे.

सत्यता पडताळणी सुरू

श्री. बडगुजर यांच्‍यासह तिघांची चौकशी केली जात असताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना चौकशीसंदर्भात सूचना केल्या. चौकशीसंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असता श्री. कर्णिक यांनी चौकशी सुरू असल्‍याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

दुसरीकडे श्री. बडगुजर यांनाही चौकशीसंदर्भातील तपशीलाची विचारणा केल्‍यावर त्‍यांनीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्‍यासह अधिकारी उपस्थित होते. गुन्हे शाखेच्या तपास पथकामार्फत व्‍हायरल व्हिडिओ, छायाचित्रांची सत्‍यता पडताळण्याची कार्यवाही केली जात आहे. फॉरेन्सिक विभागाकडे व्हिडिओ, छायाचित्रे हस्‍तांतरित केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT