Salim Kutta Dance Case Esakal
नाशिक

Salim Kutta Dance Case: सलिम कुत्ता- बडगुजर डान्सपार्टी ‘मे-16’ तील

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत डान्सपार्टी प्रकरणी उबाठाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर पोलीस चौकशीमध्ये समाधानकारक उत्तरे देत नसल्याने अखेर पोलिसांनी त्यांच्या शैलीनुसार डान्सपार्टीची माहिती मिळविली आहे.

त्यावरून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, सलिम कुत्तासोबतची डान्सपार्टी आडगाव परिसरातील फार्महाऊसवर मे २०१६ मध्ये झाल्याचे उघडकीस आलेली असून ही पार्टी सलिम कुत्ताची पॅरोल रजा संपण्याच्या आदल्या दिवशी आयोजित करण्यात आलेली होती. (Salim Kutta sudhakar Badgujar Dance Party from May 16 nashik political crime news)

मुंबई बॉम्बस्फोटातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी सलिम कुत्ता आणि उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा डान्सपार्टीचा व्हिडिओ सध्या राज्यभर गाजतो आहे.

याप्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे सुधाकर बडगुजर यांची दररोज चौकशी करीत आहेत.

परंतु आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये बडगुजर यांनी बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे बडगुजर व सलिम कुत्ता यांची भेट, पार्टीमागचा उद्देश, पार्टीचे आयोजक, ठिकाण व नेमकी चर्चा अशी प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळत नव्हती.

दरम्यान, पोलिसांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाकडेही सलिम कुत्ता व बडगुजर यांच्यासंदर्भातील माहिती मागविली होती. त्यामध्ये महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

सलिम कुत्ता २०१२ ते २०१६ यादरम्यान नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. तर, २०१६ मध्ये सुधाकर बडगुजर हे राजकीय आंदोलनातील गुन्ह्याप्रकरणी पाच दिवस नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.

ओळख अन्‌ पार्टी

आरोपी सलिम कुत्ता याला एप्रिल ते मे २०१६ या दरम्यान पॅरोल रजा मिळाली होती. २०१६ मध्येच बडगुजर कारागृहात असताना दोघांची भेट झाली असावी.

सलिम कुत्ताची पॅरोल रजा संपण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे, २४ मे २०१६ रोजी आडगाव हद्दीतील एका फार्महाऊसवर पार्टी आयोजित करण्यात आली असता, त्याच पार्टीतील सलिम कुत्ता व बडगुजर यांच्या डान्स पार्टीचा तो व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

बॅरेक स्वतंत्रच...

२०१६ मध्ये सलिम कुत्ता आणि न्यायालयीन कोठडीतील सुधाकर बडगुजर या दोघांचे बॅरेक स्वतंत्र असल्याचे कारागृह प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

तसेच, जेवणावेळी या दोघांची भेट झाली असावी, अशी शक्यताही व्यक्त होते आहे.

"सलिम कुत्ता-बडगुजर यांच्यासंदर्भात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाकडून अहवाल प्राप्त झाला. त्यातून काही महत्त्वाच्या माहितीनुसार पोलिसांनी तपास केला. त्यानुसार काही बाबी समोर आल्या आहेत. आणखीही सखोल तपास सुरू आहे."

- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT