Menstrual Leave esakal
नाशिक

Menstrual Leave : मासिक पाळीला शिक्षिका, विद्यार्थिनींना एक दिवस सुट्टी! जनजागृतीसाठी केला ठराव

सकाळ वृत्तसेवा

Menstrual Leave : अंध:श्रध्दा आणि रुढीग्रस्त समाजाची मानसिकता, अज्ञान गैसमजुतीमुळे महिलांच्या मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत दूषित झालेला आहे.

समाजाची ही मानसिकता बदलावी आणि मासिक पाळीविषयी जनजागृती करून महिलांचे जटिल होत चाललेले आरोग्याचे प्रश्न सुटावेत यासाठी येथील समता प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. (Samata Pratishthan decided to give day off to women teachers students of institution on menstruation nashik news)

पाळीच्या दिवशी संस्थेतील महिला शिक्षिका, विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी देण्याचा ठराव समता प्रतिष्ठानने केला आहे. मासिक पाळी दिनाचे (ता.२८) औचित्य साधून हा ठराव करून त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी दिली.

ते म्हणाले,‘ आज २१ व्या शतकातही महिला व विद्यार्थींनीना येणारी मासिकपाळी ही जणू काही स्त्री जातीला मिळालेला शापच आहे, असे भासवले जाते. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली, तरीही मासिकपाळी या वरदानरुपी देणगीला अनेक लोकं संकुचित दृष्टिकोनातून आणि शापित नजरेने बघतात, हे मोठे दुर्दैव आहे.

एरव्ही स्त्रीला लक्ष्मी रुपात बघणारे आपण मासिकपाळीच्या काळात तिला वेगळे का ठेवतो? मासिकपाळीच्या काळात सतत होणाऱ्या रक्तस्रावामुळे तिला खूप थकवा आलेला असतो, त्यामुळे तिची थोडी चिडचिड सुद्धा होत असते. अंग दुखत असते. मात्र बऱ्याच मुलींना किंवा स्त्रियांना त्या दिवसात सुद्धा खूप कामे करावी लागतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आजही अनेक कुटुंबात मासिकपाळीच्या काळात त्या मुलीला किंवा स्त्रीला अपराधीपणाची वागणूक दिली जाते. तिला चुकून कुणाचा स्पर्श झाला तर ते अशुभ मानले जाते. पाच दिवसांसाठी ती अपराधी ठरते अन मासिक पाळीबाबत स्वतः स्त्रीला देखील संकोच वाटत असतो.

ती स्वतःच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत नसल्यामुळे तिला गर्भाशयाच्या कर्करोगापासून विविध संसर्गापर्यंतच्या गंभीर स्वरूपाच्या आजारात ढकलू शकतात, असा संपूर्ण विचार करून संस्थेने हा ठराव केला असल्याचेही प्रा. कोकाटे यांनी सांगितले.

२०२३ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात ८ मार्चला आमदार कपिल पाटील यांनी विधानपरिषदेत मासिक पाळी दरम्यान महिलांना एक दिवसाची सुट्टी मिळावी अशी मागणी केली होती. त्यालाच प्रतिसाद म्हणून सामाजिक भान जपत समता प्रतिष्ठानने शैक्षणिक संस्थेने मासिक पाळीच्या दरम्यान संस्थेतील महिलांना सुट्टी देण्याचा ठराव केला आहे.

बिहार, केरळ राज्यात महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची सुट्टी दिली जाते. महाराष्ट्रात सुद्धा हे सर्वत्र व्हावे अशी अपेक्षा आणि गरज ठरावात आवर्जून नमूद करण्यात आलेली आहे. या बैठकीला सरचिटणीस दिनकर दाणे, उपाध्यक्ष डॉ. त्र्यंबक दुनबळे, संचालिका सुधा पाटील, संचालक प्रा. प्रवीण मेहेत्रे, गणेश गाडे, कानिफनाथ मढवाई, सलिल पाटील, प्राचार्य ओंकार बिडवे उपस्थित होते. बैठकीत आमदार कपिल पाटील यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT