A crowd of citizens gathered when the bodies of the deceased were brought here. esakal
नाशिक

Samruddhi Highway Accident Case: राजीवनगरवर शोककळा, चौघांच्या मृत्यूने हळहळ

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : चिखलीजवळ सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या राजीवनगर वसाहतीतील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघे ठार झाल्याने संपूर्ण राजीवनगर परिसर सुन्न झाला.

झुंबर काशीनाथ गांगुर्डे (५८), त्यांच्या पत्नी सारिका गांगुर्डे (४८) आणि लहान मुलगा अमोल गांगुर्डे (१८) यांच्यासह या भागात राहणाऱ्या अंजना रमेश जगताप (६०) आणि सारिका यांच्या बहिणीची कन्या गौळाणे येथील रजनी गौतम तपासे (३२) हे अपघातात ठार झाले. (Samruddhi Highway Accident Case Mourning at Rajivnagar death of four nashik)

‘समृद्धी’वरील अपघातात येथील चौघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी श्रद्धांजली वाहत दांडिया स्थगित केल्याचा लावलेला फलक

रजनी यांचे पती गौतम हे कॅनडा कॉर्नर येथील मलबार गोल्ड फर्ममध्ये नोकरीला होते, तेही या अपघातात जखमी झाले आहेत. गरीब परिस्थिती असणाऱ्या या कुटुंबांवर काळाचा घाला पडल्याने सर्वच हळहळले होते.

राजीवनगर येथील चौघांवर सिडकोतील मोरवाडी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तपासे यांच्यावर गौळाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गांगुर्डे यांचा मोठा मुलगा विकासला सोबत असलेल्या एकाने रविवारी (ता. १५) पहाटे फोन करून ही माहिती दिली.

तो लगेच लहान भाऊ आकाश आणि गांगुर्डे यांचे मावसशालक मल्हारी जाधव यांच्यासह वैजापूर येथे निघाले. माजी सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी सकाळी वसाहतीत जात नातलगांना आधार दिला.

दुपारी दोनच्या सुमारास या सर्वांचे पार्थिव राजीवनगरला आल्यावर उपस्थित नातेवाइकांना शोक अनावर झाला होता.

आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे यांनी सांत्वन केले.

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अमरधाममध्ये श्रद्धांजली वाहिली. आमदार हिरे यांनी मोरवाडी येथील अमरधाममध्ये सर्व पार्थिवांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार व्हावेत, अशी व्यवस्था केली.

झुंबर गांगुर्डे या भागात सैलानीबाबांचे भक्त म्हणून प्रसिद्ध होते. अनेक वर्षांपासून ते समाजबांधव आणि नातेवाइकांना हमखास सैलानीबाबांच्या दर्शनासाठी घेऊन जात. आतापर्यंत शेकडो भाविकांना त्यांनी दर्शन घडवून आणले होते.

शुक्रवारी (ता.१३) त्यांची ही वारी मात्र अखेरची ठरली. समाजातील अनेक गरीब समाजबांधव त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आणि सैलानीबाबांचे मोठे भक्त म्हणून सल्ला घेण्यास येत, अशी माहिती स्थानिक युवक संदीप वाव्हळ याने दिली. ते खासगी कंपनीत तात्पुरत्या नोकरीला होते.

विकास आणि आकाश हेही खासगी कंपनीत काम करतात. सारिका गांगुर्डे या जवळच असलेल्या स्टायलो फर्निचरमध्ये कामाला होत्या. अमोलनेही त्यांच्यासोबत काम सुरू केले होते. पूर्वी हे कुटुंब मासेमारीचा व्यवसाय करायचे.

काही महिन्यांपासून त्यांनी तो बंद केला होता. अपघातात ठार झालेल्या अंजना जगताप यांचे पती रमेश आणि दोन मुलगे किशोर व सागर यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. लहान मुलगा विशाल जगताप हा २३ वर्षांचा आहे.

मंत्री अतुल सावेंची मदत

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांनी परिसरात चौकशी केली असता क्रिकेट क्लबचे सदस्य मल्हारी जाधव यांनी त्यांना याबाबत माहिती दिली.

आमदार सीमा हिरे, महेश हिरे, ॲड. बडोदे आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी तेथे पोचलेल्या नातेवाइकांशी संपर्क साधला. मंत्री अतुल सावे यांना याबाबत माहिती दिली. त्यांना आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली.

त्यानुसार सावे यांनी वैजापूर येथे जात नाशिकमधून संबंधितांचे नातेवाईक पोचण्याच्या आत सर्व व्यवस्था केली. आवश्यकतेनुसार इतर जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT