नाशिक : समृद्धी महामार्गावरून प्रवासाला निघालात ! टायरची काळजी घ्या ! अतिवेगाचा मोह टाळत असताना हवेचे प्रसरण होऊन टायर फुटू नये म्हणून टायरमध्ये नायट्रोजन भरा. सलग वाहन चालवताना तंद्री लागून किती वेगाने वाहन चालवतोय याचे भान राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी हे सल्ले दिले आहेत. (Samruddhi Highway Ride Take care of tire Nashik News)
मुंबई ते नागपूरचे अंतर समृद्धीच्या पहिला टप्पा खुला झाल्याने कमी होण्यास मदत झाली आहे. ७०१ किलोमीटर अंतरासाठीच्या या प्रकल्पावर ५५ हजार कोटींहून अधिक खर्च होणार आहेत. १६ तासांचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. आज सकाळी नागपूरहून निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बसगाडी ७ तासात शिर्डीमध्ये पोचली. १० जिल्ह्यातील ३९२ गावांशी संलग्न असलेल्या समृद्धी महामार्गावरून महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी ताशी १२० किलोमीटर सर्वोच्च वेग मर्यादा निश्चित केली आहे.
दुचाकी, ऑटोरिक्षा, क्वाड्रीसायकलला परवानगी देण्यात आलेली नाही. ‘एम-१' श्रेणीत ८ प्रवासी १२० किलोमीटर ताशी या वेगाने, तर घाट आणि बोगद्यातून १०० किलोमीटर ताशी वेगाने जाणे अपेक्षित आहे. तसेच आठपेक्षा अधिक प्रवासी असल्यास ताशी १०० किलोमीटर, तर घाट व बोगद्यातून ८० किलोमीटर ताशी वाहन चालवणे आवश्यक असेल. ‘एन' श्रेणीतील सर्व माल वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा ८० किलोमीटर ताशी अशी निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
अपघाताच्या घटना
वैजापूरजवळ गुरुवारी धावती कार पेटली. तसेच बुलढाण्यात ५ अपघात झाले आहेत. १२ डिसेंबरला २, १५ डिसेंबरला १ आणि १६ डिसेंबरला २ अशा अपघातांचा त्यात समावेश आहे. अपघाताची कारणे शोधण्यात येत आहेत. मात्र समृद्धी महामार्गावरून वाहन चालवताना वेगावर स्वतः नियंत्रण ठेवणे आवश्यक बनले आहे. प्रवासापूर्वी ३२ ते ३३ बास इतकी हवा टायरमध्ये भरली जाते. अधिक वेळ वाहन चालविल्याने टायरमधील हवा प्रसरण पावते आणि ४५ ते ५० पर्यंत हवेचे प्रमाण पोचते व त्यामुळे टायर फुटण्याचा धोका बळावतो.
म्हणूनच टायरमध्ये नायट्रोजन भरत असताना ‘अलायमेंट’ तपासायला हवी. एवढेच नव्हे, तर सलग १०० ते १५० किलोमीटरपर्यंत प्रवास केल्यावर किमान दहा मिनिटे थांबायला हवे. सलग वाहन चालवताना तंद्री लागते आणि किती वेगाने वाहन चालवतो याचे भान राहत नाही. अशावेळी डुलकी लागण्याची शक्यता अधिक असते. त्यातच, वाहनापुढे अडथळा येताच, नियंत्रण सुटते आणि अपघाताला आमंत्रण मिळते. अशा प्रकारचे अपघात इतरत्र घडल्याची उदाहरणे ताजी आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.