Ex-MLA and Chairman Sanjay Pawar, Director Vitthal Aher presenting their position in the press conference. esakal
नाशिक

Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी भुजबळांची भूमिका अमान्य; संजय पवारांनी सोडली राष्ट्रवादी

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळांची आरक्षणाची भूमिका मान्य नाही. मराठा समाजातील अनेकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भुजबळांची साथ सोडत राष्ट्रवादीला रामराम करत असल्याचे माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

बाजार समितीत आघाडीतील घटक पक्षातील सहकारी कामकाज करून देत नसल्याचा आरोप करत सभापतिपदाचाही राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. (Sanjay Pawar left NCP on bhujbal stand on maratha reservation nashik news)

मनमाड बाजार समितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संचालक विठ्ठल आहेर उपस्थित होते. सभापती पवार यांनी बाजार समितीच्या आघाडी गटातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांच्यावर टीका केली. आमदार सुहास कांदे यांच्याकडे माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो.

परंतु माझ्याकडे संशयाने बघितले गेले. त्यामुळे सभापतिपदाच्या साडे चार महिन्यांच्या कालावधीत मला कामकाज करताना अडवले गेले. प्रत्येक गोष्टीत विरोध केला गेला. समितीच्या सभेत माझे विषय नामंजूर केले गेले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड या दोन्ही संचालक मला जाणून बुजून त्रास देत राहिले.

राष्ट्रवादीच्या नावावर सभापती झालो, पॅनल उभे केले, नेता असताना मला बळजबरीने उभे केले, दीपक गोगड, गणेश धात्रक यांच्यात हिम्मत नव्हती म्हणून मला उमेदवार केले. मी सभापतिपद मागितले नव्हते. कामकाज चुकीचे निघाले तर राजकारणातून निवृत्ती घेईन. धात्रक, गोगड यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे.

ते विरोध पत्करायला तयार नाही

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळांची भूमिका स्पष्ट नाही.

त्यांचा आरक्षणाला विरोध पाहून अनेक मराठा तरुण आक्रमक झाले असून याबाबत आम्हाला जाब विचारला जात आहे. मी समाजाच्या विरोधात जाऊ शकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची साथ सोडत आहे.

त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहे. नांदगाव तालुक्याच्या राजकारणावरील श्री पवार म्हणाले की, भुजबळ हे केवळ देखावा आहे. विरोध घ्यायला तयार नाही. आम्हाला विरोध म्हणून पुढे केले जाते. पाठबळ दिले जात नाही. त्यांनी तडजोडी केल्या तर चालतात पण विकासाच्या कामानिमित्त आम्ही काही केले की ते चालत नाही. भुजबळांच्या या भूमिकेला कंटाळून त्यांच्यापासून बाजूला होत आहे.

कांदेकडे गेल्याने टार्गेट!

आमदार सुहास कांदे यांच्याकडे मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो. तिकडे का गेले म्हणून अनेकदा विचारले गेले. नको तो आरोप माझ्यावर केले गेले. आमदार कांदे आणि मंत्री भुजबळ एकाच सरकारमध्ये आहे. भुजबळ कांदेंशी वाद घ्यायला तयार नाही. आम्हाला पुढे केले जाते. तालुक्याच्या राजकारणात आम्ही विरोध घ्यायचा. इथे आम्ही

भांडायचे. तिकडे भुजबळांनी एकाच सरकारमध्ये सामील व्हायचे. त्यांनी सत्ता भोगायची आम्ही मात्र विरोधाचे धनी का व्हायचे असा प्रश्न श्री. पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान सभापतिपदाच्या निवडणुकीवेळी आपण पुढील भूमिका जाहीर करू असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT