parambir singh Sakal
नाशिक

पुनूमियाची सिन्नरमध्ये जमीन; परमबीर सिंग यांच्याशी संबंध असल्याची चर्चा

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : बनावट शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र जोडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा कथित साथीदार असलेल्या संजय पुनूमिया याने धारणगाव व मिरगाव (ता.सिन्नर) येथे शिर्डी महामार्गालगत तब्बल साडे दहा हेक्टर शेतजमीन खरेदी केली आहे. धारणगाव येथील २००७ मधील एका खरेदी प्रकरणात पुनूमियाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. यामुळे राजकीय व हायप्रोफाईल वर्तुळात खळबळ उडाली असून सिन्नर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान सध्या ठाणे येथे अटकेत असलेला पुनूमियाला येथे आणल्यानंतर ह्या गुन्ह्यातील तीव्रता अधिक स्पष्ट होईल.

सिन्नर- शिर्डी महामार्गालगत असलेल्या शेतजमिनी खरेदीसाठी एकेकाळी मुंबईतील बड्या राजकीय व्यक्ती, उद्योगपतींसह हायप्रोफाईल व्यक्तींच्या उड्या पडल्या होत्या. त्यामुळे या जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. परमवीर सिंग प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संजय मिश्रीलाल पुनूमिया यानेही २००७ मध्ये धारणगाव येथील शिर्डी मार्गालगत असलेली शेती गट क्रमांक ३१० मध्ये एक हेक्टर ७८ आर जमिनीची खरेदी केली होती. हे खरेदी खत नोंदवताना त्याने उत्तन (ता. ठाणे) येथील एका शेती गटाचा बनावट सातबारा उतारा सादर केला होता.

दीर्घ कालावधीनंतर या जमीन खरेदी प्रकरणाची सुई परमवीरसिंग यांच्याकडे सरकल्यानंतर पुनूमिया याचे शेतकरी असल्याचे ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर सिन्नर येथील दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांच्या तक्रारीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परमवीर सिंग यांनी पूनूमिया याच्या नावे बेनामी संपत्ती केल्याची चर्चा असून त्यादृष्टीने राज्य गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिस यंत्रणा तपास करीत आहे.

अशा आहेत पुनूमियाच्या जमिनी

सिन्नर तालुक्यात पुनूमिया याच्या नावाने धारणगाव येथील भोकणनाला शेजारच्या शेती गट क्रमांक ३१० मध्ये एक हेक्‍टर ७८ आर क्षेत्र आहे. याच खरेदीसाठी त्याने सादर केलेला शेतकरी असल्याचा सातबारा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच शेतीलगत असलेल्या गट क्रमांक ३११ मध्येही संजय व त्याचा मुलगा सनी पुनूमिया याच्या नावे दोन हेक्टर २६ आर सामाईक क्षेत्र खरेदी करण्यात आले आहे. धारणगाव येथील एकूण शेतजमीन चार हेक्टरच्या आसपास आहे. मिरगाव शिवारातही सायाळे फाट्यावर शिर्डी मार्गाला लागून शेती गट क्रमांक ४७७-१ मधील चार गट उभय पिता-पुत्रांच्या नावाने असल्याचा सातबारा 'सकाळ'च्या हाती लागला. या ठिकाणी हायवे फ्रंट असलेली सहा हेक्‍टर ३८ आर एवढी जमीन पुनूमिया याच्या नावे आहे. पाथरे येथे गोदावरी कालव्यालगत विहीर खोदण्यासाठी एक गुंठा क्षेत्र खरेदी केल्याची नोंद असून तेथून पाइपलाइन करून मिरगाव येथे पाणी आणण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT