sanjay raut & deepak pandey esakal
नाशिक

...म्हणून संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांची थोपटली पाठ!

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर महाराष्ट्रभर सेना आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण (shivsena and bjp) झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत आले. यासंदर्भात नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (sudhakar badgujar) (ता.२३) यांनी रात्री १ वाजता तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केंद्रिय मंत्री नारायण राणेंवर सर्वप्रथम आयुक्त दिपक पांडे (CP Deepak Pande) यांनी गुन्हा नोंदवून त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. आज (ता.२८) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर असून राऊत यांनी नाशिक पोलीस आयुक्त (Nashik Police Commissioner) कार्यालयात आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांच्या कामाचं कौतुकही केलं. त्यांच्या या धाडसाचं कौतुक करत संजय राऊत यांनी आयुक्तांची पाठ थोपटली.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर आधारे आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना राणेंच्या अटकेचे आदेश दिले होते. याबाबत स्वत: दिपक पांडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे राणेंच्या अटकेच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिले होते. 'नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर उपराष्ट्रपतींना माहिती दिली जाईल. त्याचबरोबर, जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी, इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी यानांही सर्व माहिती दिली जाईल. घटनेनुसार राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर गुन्हागारी केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. पण बाकीच्यांना ,सदस्यांना अटक करता येऊ शकते. त्यामुळे राणेंच्या अटकेच्या आदेशाचा निर्णय घेतला आहे. असे आयुक्त दिपक पांडे यांनी सांगितले होते.

नारायण राणेंविरोधात अटकेसंदर्भात काय म्हणाले होते पोलीस आयुक्त?

राजकारण शासकीय यंत्रणेच्या मध्ये घेता येत नाही. परंतु नारायण राणेंनी जे वक्तव्य केले. आणि तक्रार केल्यानंतर अटकेचे आदेश केले. त्यामध्ये सर्व प्रिव्हिलेज पाळले जाईल. याबाबत आम्ही रत्नागिरी पोलिसांना देखील सांगितले आहे. कायदा मोठा आहे. मी पक्ष बघत नाही. तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला असून संविधानानुसार मंत्री ही मोठी व्यक्ती आहे. त्यानुसार आम्ही तक्रार दाखल करून घेतली आहे. ज्यांनी दगडफेक केली त्यांना नक्कीच अटक होऊन कारवाई होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT