Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari esakal
नाशिक

Sanjay Raut press | अंधारेंवर बोलणारे राज्यपालांविषयी गप्प का? : संजय राऊतांची टिका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या ॲड. सुषमा अंधारे यांच्या जुन्या क्लिपा काढून त्यांना आणि शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होउनही हीच मंडळी मात्र गप्प कसे आहेत अशी टिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी केली. (Sanjay Raut statement in defence of sushma andhare nashik political news)

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी परिषदेत विविध मुद्द्यावर चर्चा केली. उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड आदी नेते उपस्थित होते.

श्री. राऊत म्हणाले, सुषमा अंधारे या शिवसेनेत नसतानाच्या त्यांच्या वक्तव्याच्या क्लिपा शोधून शिवसेनेवर आणि अंधारे यांच्यावर टिका केली जात आहे. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा कॉग्रेसवर टिका केली आहे, त्यामुळे जुन्या भूमिकांचा आधार घेत टिका करणे अयोग्य आहे. आज त्यांच्या भूमिकेवर विरोधकांना उत्तरे देता येत नाही.

राज्यभर अंधारे यांनी भाजप व गद्दार मंडळीची लक्तरे काढली आहेत, त्यांच्या दौऱ्याला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळेच त्यांच्यावर टिका होते आहे. मात्र हीच मंडळी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होऊनही गप्प आहेत. राज्यपाल, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, पर्यटनमंत्री अशा अनेक जण सातत्याने अवमान करीत असताना त्यांच्याविषयी ‘ब्र’ काढत नाही.

खासदार गोडसेवर टिका

राऊत यांनी खासदार गोडसे यांच्यावर पुन्हा टिका केली. ‘मी नाशिकला लोकसभेची निवडणूक लढवावी असे त्यांचे म्हणणे आहे. पण मी कशाला ? जिल्ह्यातील कुणीही शिवसैनिक गोडसे यांचा पराभव करेन. गेल्यावेळीच त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेतून विरोध होता. मात्र विद्यमान खासदार म्हणून उमेदवारी कापायची कशी? असा विचार करुन पक्षातील नेते मंडळीनी त्यांना उमेदवारी दिली. मात्र पक्षातील कार्यकर्त्यांचा त्यांच्या उमेदवारीला

विरोध होताच. पक्षाचा निर्णय होता, त्यात एकदा चूक झाली. पण आता जिल्ह्यातील शिवसेनेचा साधा सैनिकही त्यांचा पराभाव करू शकेल असा दावा राऊत यांनी केला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

केंद्रीय पोलिस नेमा

महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील वादग्रस्त भागात कर्नाटक कडून अन्याय होतो आहे. त्यामुळे केंद्र शासनाने त्या भागात कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त काढून केंद्रीय राखीव दलाचे तटस्थ पोलिस नेमावेत. अशी मागणी केली. सिमावर्ती भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रशासीत भाग करुन तेथे केंद्राने हस्तक्षेप करीत मराठी बांधवावरील अत्याचार थांबवावे अशी मागणी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस विदर्भाचे असले तरी, विदर्भात होणारे हिवाळी अधिवेशन आठ दिवसांत गुंढालले जाणार असेल तर तेथील नागरिकांनीच जाब विचारायला हवा, चीनच्या कुरापतीवर बोलतांना राउत यांनी देशाचे भाजपचे नेतृत्व चीनचे नाव घेउन कधीच बोलत नाही. लडाख, अरुणाचल प्रदेशात चीनने अतिक्रमण केले आहे. मात्र केंद्र शासन मुग गिळून आहे. असाही आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT