sanjay raut news esakal
नाशिक

Sanjay Raut : कुरुलकर प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली; खासदार राऊत

त्र्यंबकेश्‍वरसाठी कशाला हवी एसआयटी?

सकाळ वृत्तसेवा

Sanjay Raut : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेला कुरुलकर पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकतो. त्यावेळी भाजप सरकार एसआयटी नेमत नाही. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोचले आहेत.

हवाई दलाचे लोक त्यात अडकले असून, भाजप व संघाशी सर्व संबंधित आहेत. या विषयावरून लक्ष हटविण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर, शेवगाव, अकोल्यात दंगली घडविल्या जात आहेत.

परंतू, महाराष्ट्र एकसंघ आहे, एकसंघ राहिल. तुम्ही दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी दिले. (Sanjay Raut statement Riots to divert attention from Kurulkar case nashik political news)

बुधवारी (ता. १७) माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्य शासनाने खरे तर कुरुलकर प्रकरणात एसआयटी नेमली पाहिजे; परंतू ते त्र्यंबकेश्‍वर प्रकरणात चौकशी समिती नेमत आहेत. कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत.

त्र्यंबकेश्‍वर घटनेवर एसआयटी कसली नेमताय? रामनवमीनंतर दंगल झाली तेव्हा एसआयटी नेमली का? गेल्या साठ वर्षात रामनवमीला कधी दंगली झाल्या नाहीत. त्या यंदाच्या रामनवमीला झाल्या. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राहायला हवा.

दंगली घडवून राजकारण करायचं असेल, तर ते कधी होणार नाही. त्र्यंबकेश्‍वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही. कुणीही बळजबरी घुसलं नाही. शंभर वर्षांपासून मंदिराच्या मुख्य दरवाजावर धूप दाखवण्याची परंपरा आहे.

महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा योजनाबद्ध पद्धतीने बिघडविण्याचे खेळ सुरु आहेत. जनतेचा पाठिंबा नसल्याने सरकारकडून दंगली घडविल्या जात आहेत. महाराष्ट्रात हिंदुत्त्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडविण्याचा कट दिसून येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्र्यंबकेश्‍वर मंदीरात यापुर्वी कोणीही घुसल्याची माहिती नाही. त्र्यंबकेश्‍वर आस्थेचा व श्रद्धेचा विषय आहे. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पत्र लिहायला सांगितले असल्याचेही राऊत म्हणाले.

दर्ग्यावर संघाचे लोक

मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जाण्याची परंपरा आहे. त्यानुसारच हे झालंय. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. अजमेर शरीफ, माहिम, हाजीअलीच्या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणावर हिंदू जातात.

त्यात संघाचेही लोक असतात. तिथे पोलिसांकडूनही चादर चढविली जाते. हा श्रद्धेचा विषय आहे, असेही खासदार राऊत या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT