Sanskrit Day 2023 : संस्कृत भाषा सोपी व्हावी, युवकांच्या सहभागासह आवड निर्माण करण्यासाठी नाशिकच्या तरूणांनी पुढाकार घेतला आहे. सरावातून प्रशिक्षण युवकांना दिले जात आहे.
नाट्य सादरीकरणासह शास्त्र ग्रंथ, दस्ताऐवजीकरण, हस्तलेखनाच्या विविध विषयांमधून संस्कृतची पौराणिकतेतून आधुनिकतेकडे वाटचाल सुरू आहे. (Sanskrit language progress from mythology to modernity nashik news)
संस्कृत शास्त्र ग्रंथासाठी रूचिता पंचभाई काम करीत आहे. विविध स्तरावर काम केले जात असून, लोकांना जोडण्याचे नाटक प्रभावी माध्यम असल्याने संस्कृत नाटकाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी हस्तलेख्यम मनूस्क्रिप्ट, संस्कृत भाषा सभा, एचपीटी कॉलेज संस्कृत विभाग, कृष्णव्दैपायन गुरुकुल आदी संस्था काम करीत आहे.
संहितेमधील उच्चारण, भाषा, भाषेचे अनुवादितेसाठी आठ तरुण एकत्र काम करीत आहे, एचपीटी महाविद्यालयातील संस्कृत विभागाचे विद्यार्थी संस्कृत उच्चारणासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वेगळे वर्ग चालविले जात आहे.
भाषा सोपी होण्यासाठी व्याकरणावर भर न देता ऐकून, बोलून सरावाने भाषा सोपी करण्याचा प्रयत्न असून प्रशिक्षणही दिले जात आहे. २०२२ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत सहा नाटकांची संख्या २०२३ मध्ये दहावर गेली. नाशिकमधून सर्वाधिक नाटकांच्या एंट्री आल्याने मुंबई, नागपूरचे प्रयोगही नाशिक केंद्रावर घेण्यात आले. असे एकूण १८ नाटके सादर झाली.
चारशे वर्ष जुन्या पोथ्यांवर काम
नाशिक, नगर, सोलापूरमधून राष्ट्रीय पांडुलिपी मिशन अंतर्गत २००५ पासून पुण्यातील भांडारकर सेंटरच्या माध्यमातून चारशे वर्ष जुन्या पोथ्यांचे दस्ताऐवजीकरण होत आहे.व्यक्तीगत, संस्थांतर्गत अनेक संग्रह नाशिकमध्ये आहे. जुन्या पोथ्यांची काळजी घेऊन त्यातील नोंदी घेतल्या जात आहे. नोंदी घेतल्यानंतर पोथ्यांचे आणखी आयुष्य वाढण्यासाठी काळजी घेतली जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"जुन्या पोथ्यांची काळजी घेऊन त्यातील तीस हजार हस्तलिखित नोंदी घेतल्या आहेत. नागरिकांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढला असून भारतीय विद्येवर काम करीत असताना संस्कृत कार्यशाळा घेण्याचे काम सुरू आहे. त्यातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे." - अनिता जोशी, हस्तलिखित अभ्यासक
"तरूणांनी संस्कृत भाषेकडे न बघता ज्ञान म्हणून बघावे. संस्कृत भाषा म्हधून बघितले तर त्यात वाव कमी आहे. संस्कृतमध्ये व्यावसायिक, उद्योजकता निर्माण करू शकते. संस्कृत प्रशिक्षणासाठी उपयोग खूप मोठा आहे." - तन्मय भोळे, लेखक, दिग्दर्शक
"संस्कृतमध्ये विद्यार्थी संशोधत्मक कार्य करीत आहे. मातृभाषेतून शिक्षणाचा नवीन शैक्षणिक धोरणात प्रभाव असल्याने व्यावहारिक, उद्योजकतेचा दृष्टिकोन ठेवत संस्कृतमध्ये काम केले जात आहे. संस्कृतमध्ये कलात्मकता असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे तसेच व्यावहारिक उपयोजनेचे काम सुरू आहे." -डॉ. लीना हुन्नरगीकर, एचपीटी महाविद्यालय
"संस्कृत नाटकांमध्ये नवीन संहितांवर काम गेले जात आहे. संस्कृतमध्ये आधुनिकता आणली जात असून फ्रेन्ड, झुंजार मराठी नाटके अनुवादित करून संस्कृतमध्ये सादरीकरण होणार आहे. बालनाटकांचा प्रयोगही होणार असून चौकट मोडण्याचे काम चैतन्य गायधनी, तन्मय भोळे करीत आहे."- कल्पेश कुलकर्णी, कलाकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.