The palanquin of saint Nivrittinath Maharaj arrived in Nashik, the warkari who participated in chanting Harinama. esakal
नाशिक

Nivruttinath Maharaj Palakhi: निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा विसावला शहरात; शासनाकडून 32 लाखांचा निधी प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

Nivruttinath Maharaj Palakhi : ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ असे अभंग गात टाळ मृदंगधारी वारक-यांसह डोईवर तुळशीवृंदावन धारण केलेल्या हजारो महिला वारक-यांसह निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याने सकाळी नऊला शहरात प्रवेश केला.

महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या सीईओ असिमा मित्तल आदींसह स्वागत समितीच्या पदाधिका-यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात दिंडीचे स्वागत केले. दुपारनंतर दिंड्यांनी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

दिंडीचा मुक्काम रात्री गणेशवाडीतील महापालिका शाळेच्या आवारात राहिला. (sant Nivruttinath Palakhi Ceremony in City 32 lakhs received from Govt nashik news)

या वर्षापासून शासनाकडून पालखी सोहळ्याला ३२ लाख रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला असून पुढील वर्षापासून नाशिक महापालिकेनेही दरवर्षी तीन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. दोन दिवस परिसरात मुक्काम केल्यानंतर पालखी सोहळा उद्या (ता.५) दुपारी सिन्नरकडे रवाना होणार आहे.

४५ दिंड्या अन ५० हजार वारकरी

पालखी सोहळ्यात ४५ दिंड्या सामील असून ५० हजार वारकरी पायी वारीसाठी सहभागी झाले आहेत. याठिकाणी मानकऱ्यांसह चोपदार, विणेकरी, टाळकरी यांचा सन्मान करण्यात आला. मनपा अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत, आमदार हिरामण खोसकर,

तहसीलदार नरेश बहिरम, महंत भक्तीचरणदास, महंत रामकृष्ण महाराज लहवितकर, संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, दिंडीचे प्रमुख मानकरी नारायण मुठाळ,

मोहन महाराज बेलापूरकर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर आदींसह सत्कार समितीचे नरहरी उगलमुगले व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

समितीचे नरहरी उगलमुगले यांनी प्रास्ताविक स्वागत केले. सचिन डोंगरे व ॲड. भाऊसाहेब गंभीरे यांनी सूत्रसंचालन केले. पुंडलिक थेटे यांनी आभार मानले.

स्वागत शासनामार्फत व्हावे : गाढवे

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शासनाच्या मार्फत दरवर्षी भव्य स्वागत केले जाते.

संत निवृत्तिनाथांच्या नावाने निघणाऱ्या पालखीचेही वैभव या दोन्ही पालखी सोहळ्याप्रमाणेच भव्यदिव्य असावे, अशी अपेक्षा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीलेश गाढवे यांनी व्यक्त केली.

दिंडी सोहळ्याचा मार्ग

दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रकाप्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी २५ व्या दिवशी म्हणजे २६ जूनला पंढरपुरात पोहोचणार आहे.

१८ दिवसांचा पायी प्रवास करून पालखी व निवडक वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये परत दाखल होईल. त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगाव, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.

सायकलिस्टचा अवयवदान उपक्रम

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूर पायी वारीचे नाशिक नगरीमध्ये आगमन होताच मानवता हेल्प फाऊंडेशन व नाशिक सायकलिस्ट् फाऊंडेशन व नेचर ॲन्ड मी ग्रुप यांनी 'अवयव दान एक राष्ट्रीय कर्तव्य' हा उपक्रम राबविला.

या उपक्रमाची माहिती देण्यासाठी सायकलपटूंनी 'अवयव दान करा' असे फलक हाती घेतले होते. यात रवींद्र दुसाने, माधुरी गडाख, साधना दुसाने, मोहन देसाई, डॉ. नितीन रौंदळ, डॉ. मनीषा रौंदळ, माजी पोलिस आयुक्त हरिष बैजल आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मनपातर्फे वारकऱ्यांना आरोग्यसेवा

नाशिक महानगरपालिकेतर्फे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. पंचायत समिती कार्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले.

प्रशासनाकडून पालखीचे स्वागत झाल्यानंतर पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावासमोरही मनपातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. येथे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. पंचायत समिती व जलतरण तलाव येथे वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली.

१. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीने शहरात भक्तीमय वातावरण.

२. डोईवर तुलसी वृंदावनधारी महिलांच्या फुगड्या ठरल्या आकर्षण.

३. गिरणारे येथील नामदेव व प्रकाश थेटे यांच्या खिल्लारीची पालखीसाठी निवड.

४. इच्छामणी केटरर्सच्या उत्तमराव गाढवे यांच्याकडून चहा नाष्ट्याची व्यवस्था.

५. वारक-यांची गोदास्नानासह देवदर्शनास पसंती.

६. माडसांगवी येथे वारकरी भवन उभारण्याची मागणी.

७. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनची पर्यावरणविषयक जनजागृती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - टीआरपी क्वीन निक्की तांबोळी घराबाहेर; निक्कीचा बीबीमराठी ५चा घरातला प्रवास संपला

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT