On the occasion of Sant Nivrittinath Maharaj Yatrotsava, the Eco-Friendly-Clean Dindi award distribution ceremony was held by the Municipal Council on Thursday. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Yatrotsav : तूंचि चराचरीं दिससी आम्हां!! काल्याच्या कीर्तनानंतर वारकऱ्यांचे प्रस्थान

निवृत्तिनाथांच्या भक्तीने भारावले सकळ जन

कमलाकर अकोलकर

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) :

नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी ।

आनंदाची सृष्टि तया जाली ॥ १ ॥

घेरे नाम्या कवळु आनंदाचा होसी ।

तुजमाजि निवासि हरि आहे ॥ २ ॥

नामा पसरी मुख आनंदला तृप्त ।

कवळु पूर्णभरित हरिराज ॥ ३ ॥

निवृत्तीने सेविला कवळु हा हरि ।

तूंचि चराचरीं दिससी आम्हां ॥ ४ ॥

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या अभंगाच्या आनंदभावामध्ये गुरुवारी (ता. १९) द्वादशीला वारकऱ्यांनी आपल्या घराकडे प्रस्थान केले. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या भक्तीने त्र्यंबकेश्‍वरनगरी दोन दिवस भारावून गेली होती. दर वर्षी पौष वद्य एकादशीला यात्रोत्सव होतो. (Sant Nivruttinath Yatrotsav Departure of warkaris after Kalyache Kirtan nashik news)

वारकरी, भाविकांनी रामप्रहरी उठून स्नान करत देवदर्शन केले. दिंड्यांच्या फडावर काल्याच्या कीर्तनात सहभागी झाले. एकादशीचा उपवास सोडल्यावर ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर आणि उपलब्ध होणाऱ्या वाहनांनी वारकऱ्यांनी परतीचा मार्ग धरला.

राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बसगाड्यांनीही जादा फेऱ्या केल्या. त्र्यंबकेश्‍वर शहरालगतच्या दोन किलोमीटर परिसरात दिंड्यांचे फड उभारण्यात आले होते. त्यामुळे शहरामध्ये गर्दी एकवटी नाही.

प्रसाद, माळा, मूर्ती, खाद्यपदार्थ, फळे, उबदार कपडे, चादरी, ग्रंथ, धार्मिक पुस्तकांची उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली. नगर परिषदेला जागाभाडे मिळाले आणि गाळेधारकांना चांगले उत्पन्न मिळाले.

पटांगणाचा प्रश्‍न ऐरणीवर

अद्याप यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी सोय होऊ शकलेली नाही. पूर्वी यात्रेसाठी पटांगण राखीव होते. अशा ठिकाणी बचत हॉल इमारतीच्या बांधकामानंतर अतिक्रमण झाले आणि पक्क्या इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे पटांगणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

यात्रेकरूंच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर रस्ते आणि संकुचित जागेचा प्रश्‍न तयार झाला आहे. मंदिर चौकात रथोत्सव आल्यावर सगळ्या बाजूंनी भाविकांची एकदम गर्दी झाली. मात्र वारकरी आणि भाविकांनी अनर्थ टाळला.

ही सारी परिस्थिती पाहता, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात होणाऱ्या पाचपट गर्दीच्या व्यवस्थापनाचे नियोजन आतापासूनच करावे लागेल, हे प्रकर्षाने जाणवले. याशिवाय कायमस्वरूपी प्रसाधनगृहांचा विचार गांभीर्याने करावा लागणार आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

पर्यावरणपूरक-स्वच्छ दिंडी पुरस्कार

यात्रोत्सवानिमित्त त्र्यंबकेश्‍वर नगर परिषदेतर्फे पर्यावरण पूरक-स्वच्छ दिंडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पर्यावरण संवर्धन-रक्षण, प्लॅस्टिक बंदी, पाण्याचा मर्यादित वापर, कचऱ्याचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन या तत्वांवर शहरात दाखल झालेल्या पाचशे दिंड्यांचे मूल्यांकन तीन दिवसांमध्ये करण्यात आले.

त्यातून पाच दिंड्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि दिंडी उपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

निर्मलवारी अभियानाचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, यात्रा नियोजन दक्षता समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपाध्यक्षा त्रिवणे तुंगार, सदस्य कैलास चौथे, दिलीप पवार, सुनील लोहगावकर, नगर परिषदेच्या अधिकारी पायल महाले, अभिजित इनामदार आदी उपस्थित होते. पुरस्कार विजेत्या मानकऱ्यांच्यावतीने आटकवडे, पायी दिंडी सोहळ्याचे आयोजक संपत कराड यांनी मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार विजेत्या दिंड्या (कंसात पुरस्काराचे साहित्य)

० प्रथम- जायखेडा येथील कृष्णाई प्रतिष्ठान पायी दिंडी सोहळा (ध्वनिक्षेपण यंत्रणा)

० द्वितीय- धोडप किल्ला पायी दिंडी सोहळा (शेगडी व थर्मास)

० तृतीय- आटकवडे (ता. सिन्नर) पायी दिंडी सोहळा (मोठे पातेले)

० उत्तेजनार्थ- बाळेश्‍वर (ता. संगमनेर) (शेगडी व पातेले) आणि दिक्षी येथील संत जनार्दन स्वामी पायी दिंडी सोहळा (शेगडी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT