Eknath Gawli hoisting the flag on the peak and family members during the flag pooja at the trust office esakal
नाशिक

Saptashrungi Devi Chaitrotsav : गवळी कुटुंबीय जोपासताहेत कीर्तिध्वजाची परंपरा!

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : सप्तशृंगगडावर रामनवमीपासून चैत्रोत्सवाला सुरवात झाली असून, धार्मिकदृष्ट्या चतुर्दशीचा (चावदस) दिवस मंगळवार (ता. ४) हा चैत्रोत्सवातील मुख्य दिवस आहे. याच दिवशी मध्यरात्री सुमारे पाचशे वर्षांच्या परंपरेनुसार आदिशक्ती सप्तशृंगमातेचा कीर्तिध्वज समुद्रसपाटीपासून ४५६९ फूट उंचीवर लाखो भाविकांच्या साक्षीने मोठ्या दौलात फडकणार आहे.

हा कीर्तिध्वजाचे मानकरी असलेले दरेगाव (वणी) गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने आदिमायेच्या मंदिर शिखरावर ध्वज लावतात. विशेष म्हणजे देवीच्या शिखरावर चढण्यासाठी कोणताही मार्ग नाही. तरीही हे अवघड कार्य दरेगावचे गवळी (पाटील) कुटुंबीय वंशपरंपरेने करीत आहेत. (Saptashrungi Devi Chaitrotsav Gawli family cultivates tradition of Kirtidhvaja nashik news)

सप्तशृंगगडाच्या शिखरावर वर्षभरातून दोनदा कीर्तिध्वज फडकवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीच्या मध्यरात्री व नवरात्रोत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीच्या मध्यरात्री आदिशक्ती आदिमाया श्री भगवतीचा कीर्तिध्वज (भगवे निशाण) मंदिरावरील अतिशय अवघड व उंच अशा सुळका चढून शिखरावर फडकविले जाते.

दरेगाव येथील गवळी पाटील कुटुंबीयांना शेकडो वर्षांच्या पंरपरेनुसार कीर्तिध्वजाचा मान आहे. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या स्थापने (१९७५) पूर्वी बेटावद (जि. जळगाव) येथील रेणुकादास पुजारी तेथील रेणुका देवीमंदिरातून दर वर्षी चैत्रोत्सवात पदयात्रेने देवीच्या शिखरावर लावण्यासाठी निशाण घेऊन येत असत व ते निशाण सप्तशृंगगडावर ध्वजाचे मानकरी गवळी पाटील यांच्याकडे विधिवत सोपवत.

ते निशाण गवळी पाटील मंदिराच्या शिखरावर नेऊन लावत असत. आजही ही परंपरा बेटावद येथील रेणुकादास पुजारी यांच्या अनुयायी व भक्त मंडळाने कायम ठेवली आहे. असे असले तरी बेटावद येथील निशाण फक्त चैत्रोत्सवातच येत असल्याने नवरात्रोत्सवासाठी निशाणीच्या अडचणी येत असल्यामुळे ट्रस्टची स्थापना झाल्यापासून हे निशाण ट्रस्टमार्फतच विधिवत पूजा करून गवळी पाटलांकडे सुपूर्द केले जाते.

या निशाण ध्वजासाठी ११ मीटर कापड, साधारणपणे त्याच मापाची साडीही लागते. ११ फुटांची काठी तसेच शिखरावर जाताना मार्गातील देवतांची पूजा करण्यासाठी २५ ते ३० किलो वजनाचे पूजासाहित्य, धान्य या वस्तूंचे न्यासाच्या कार्यालयात विधिवत पूजन करून गवळी पाटलांकडे दिले जाते.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

यानंतर गावातून कीर्तिध्वजाची मानकऱ्यांसह ढोल-ताशांच्या निनादात व सप्तशृंगमातेच्या जयघोषात मिरवणूक निघते. मिरवणुकीनंतर ध्वजाचे मानकरी सायंकाळी साडेसहाला देवी भगवतीच्या मंदिरात पोचून देवीसमोर नतमस्तक होतात.

त्यानंतर गवळी-पाटील हे ध्वज व पूजेचे साहित्य घेऊन उत्तरेकडील सुळक्यावरून रात्र असतानाही टेंभा किंवा प्रकाशासाठी लागणारे कोणतेही उपकरण न घेता चार ते पाच तासांनी मार्गावरील इच्छित देवतांचे पूजन करीत शिखरावर पोचतात. यानंतर जुना ध्वज काढून तेथे नवा ध्वज लावला जातो. ध्वजाचे दर्शन घेऊन खानदेशवासीय परतीच्या मार्गाला लागतात.

गवळी कुटुंबीयांची परंपरा

दरेगाव येथील हरी गवळी, लक्ष्मण गवळी, रामकृष्ण गवळी, तुळशीराम गवळी यांचा वारसा सध्या ६५ वर्षीय एकनाथ गवळी पाटील यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील सदस्य आपापसांत मान ठरवून शिखरावरील निशाण फडकविण्याची परंपरा जपत आहेत. आतापर्यंत अनेकांनी शिखरावर पोचण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला किंवा पुन्हा समोर आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : राहुल गांधींचं पुन्हा खटाखट... ! राज्यात महिलांसाठी महिन्याला 3,000 रुपये अन् मोफत एसटी प्रवासाची घोषणा

Bulldozer Action: ज्यांची घरे बुलडोझरने पाडली त्यांना 25 लाखांची भरपाई द्या ! योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका

Maharashtra Election 2024: मविआनं जाहीर केली ‘लोकसेवाची पंचसुत्री’; ‘या’ पाच गोष्टींची दिली हमी

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अरुणकुमार सिंग शरण

Latest Marathi News Updates live: मोदी आमची थट्टा करतात, पण तुम्ही दिलेली एक तरी गॅरंटी पूर्ण केली का? - खर्गे

SCROLL FOR NEXT