Sapshrungi Mata Mandir esakal
नाशिक

सप्तशृंगीचे मूर्ती संवर्धन करताना मुळमूर्ती आली समोर; 26 सप्टेंबर पासून दर्शन

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री भगवती अर्थात सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धनाचे काम सुरु असतांना श्री सप्तशृंगी भगवतीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली असून तेजोमय, प्रफूल्लीत विलोभनीय अशा स्वयंभू मुळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घटस्थापनेच्या दिवशी अर्थात २६ सप्टेंबर पासून मिळणार आहे. (Saptshringi mata idol conservation Darshan started from 26 September nashik Latest Marathi News)

आदिमाया सप्तशृंगी मातेच्या मूळ स्वरूपाच्या संवर्धनासाठी विश्वस्त संस्थेच्या वतीने वर्ष २०१४ पासून प्रयत्न सुरू केले होते. त्याअंतर्गत श्री भगवती मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने विश्वस्त संस्थेच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय आणि त्यासंबंधित नियोजन सुरू केले होते.

वेळोवेळी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय. आय. टी, पवई, (बॉम्बे) यांसह पुरातत्व विभागाच्या मार्फत अधिकृत असलेल्या में. अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत केलेले प्रत्यक्ष निरीक्षणे आणि अहवाला नुसार जिल्हा प्रशासनाशी योग्य ती चर्चा विनिमय व समन्वय साधून अंतिम निर्णयासह २१ जुन २०२२ पासून विश्वस्त संस्थेच्या वतीने श्री भगवती मूर्ती / स्वरुप संवर्धन व देखभाल प्रक्रियेचे काम प्रत्यक्षात सर्व धार्मिक पूजा विधीच्या पूर्ततेनंतर सुरु करण्यात आले.

तज्ञांच्या मार्गदर्शन व प्रत्यक्ष उपस्थितीत श्री भगवती स्वरूप / मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर श्री भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपनाचा भाग (कवच) हा धार्मिक व शास्त्रोक्त पध्दतीने काढण्यात आला, आणि त्यामागे श्री सप्तशृंगी भगवतीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली.

वर्षानुवर्षे श्री भगवतीच्या स्वरूपावर धार्मिक विधी व पंचामृत अभिषेक दरम्यान केलेल्या शेंदूर लेपनाच्या मागे आढळून आलेले श्री भगवतीचे अतिप्राचीन, विलोभनीय व स्वयंभू स्वरूप लवकरच सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वी ता.१०/०९/२०२२ पासून पितृपक्ष सुरु होत असल्यामुळे शास्त्रानुसार सद्यस्थितीत भाविकांना लवकरात लवकर श्री भगवतीचे दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी शारदीय नवरात्र सुरू होण्यापूर्वी काही आवश्यक धार्मिक विधी पूर्ण होणे आवश्यक आहेत,

म्हणून संस्थान चे वतीने पितृपक्षापूर्वी आवश्यक ते सर्व धार्मिक पूजाविधी ता .०६ ते ता. ०८ सप्टेंबर २०२२ दरम्यान पूर्ण करून शारदीय नवरात्रीच्या प्रथम दिनी अर्थात सोमवार, ता. २६/०९/२०२२ रोजी श्री भगवती मंदिर हे भाविकांना श्री सप्तशृंगी देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले करण्याचे नियोजन ट्रस्ट चे वतीने करण्यात येणार आहे, त्या साठी विविध धार्मिक पीठातील विद्वान तसेच श्री क्षेत्र काशी येथील धर्मशास्त्र पारंगत पं गणेश्वरशास्त्री द्रविड, श्री. क्षेत्र नाशिक येथील स्मार्त चूडामणि पं शांताराम शास्त्री भानोसे, व श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील पुरोहित संघाच्या मार्गदर्शना प्रमाणे हे सर्व धार्मिक विधी निर्धारित केलेले आहेत,

दरम्यान उद्या मंगळवार, दि. ६ ते गुरुवार, दि. ०८/०९/२०२२ दरम्यान पूर्व नियोजना प्रमाणे श्री भगवती मंदिरात सहस्र कलश महास्नपन विधि, संप्रोक्षण विधी, उदक शांति, शांति होम इत्यादी धार्मिक पूजा विधींचे आयोजन महाराष्ट्रातील तज्ञ पुरोहितां कडून करण्यात येणार आहे, आणि संपूर्ण पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान भगवतीचे सानिध्यात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्रापूर्वीसंपन्न होणार आहेत व त्यानंतर सर्व भाविकांना श्री भगवती मंदिर सोमवार दि. २६/०९/२०२२ आश्विन शु. १ घटस्थापना पासून दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहीती स्मार्त चूडामणि पं शांताराम शास्त्री भानोसे, विश्नस्त अॅड ललीत निकम, भुषन तळेकर, मिलींद दिक्षित, बाबा दिक्षित यांनी दिली.

यावेळी नांदुरी व सप्तशृंगी गडाचे सरपंच, सदस्य, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, राजेश गवळी, संदीप बेनके, भाऊ कानडे, मधुकर गवळी, गणेश बर्डे, ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसपंर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT