Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: कंत्राटदाराकडून 30 हजारांची लाच स्वीकारताना सोग्रस येथील सरपंच, उपसरपंचास रंगेहाथ अटक

सरपंच, उपसरपंच यांनाच लाच स्वीकारताना अटक झाल्याने चांदवड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब गोसावी

चांदवड : पाण्याच्या टाकीचे बील काढण्यासाठी क़त्राटदाराकडून तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोग्रस ता चांदवड येथील सरपंच उपसरपंचला रंगेहाथ पकडले.

सोग्रसचे सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (55), आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (45) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

दस्तुरखुद्द सरपंच, उपसरपंच यांनाच लाच स्वीकारताना अटक झाल्याने चांदवड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Sarpanch Deputy Sarpanch of Sogras arrested while accepting bribe of 30 thousand from contractor Nashik Bribe Crime)

तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषद अतंर्गत सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. सदर बांधकामाचे बिल अद्याप मिळालेले नव्हते.

हे बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सही करण्यासाठी सरपंच व उपसरपंचांनी कंत्राटदाराकडे पन्नास हजार रूपयांची मागणी केली होती.

तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला व सरपंच व उपसरपंच यांना सही करून पाठवण्यासाठी इलोसे क्र 1 व 2 यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 50,000/- रु ची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30,000/- रु ची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

सापळा अधिकारी उपअधीक्षक अनिल बडगुजर, दिपक पवार. संजय ठाकरे यांच्या पथकाने अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अपर अधीक्षक माधव रेड्डी उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये आपल्याच पसंतीच्या ठेकेदारांना कामे देण्याची पद्धत रूढ आहे. अनेक कामांचे इ टेंडर झाले, तरीही मॅनेज असलेल्या कंत्राटदारांनाच कामे दिली जातात व कंत्राटदारांकडून अशा प्रकारे कमी जास्त प्रमाणात पैशांची मागणी होत असल्याचीही तालुक्यात चर्चा आहे.

टक्केवारी च्या कामांच्या पैशांच्या आशेपोटी या कामांची गुणवत्ता ही ढासळलेली असते या सर्व प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेचाही कानाडोळा असतो हेही तितकेच खरे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT