Nashik Protest News : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांनी जिल्ह्यात तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन बुधवारी (ता.२०) सायंकाळी मागे घेण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते कैलास वाघचौरे यांनी दिली. (Sarpanch village sevak strike called off nashik news )
गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील सुमारे १३८८ ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले होते. या संपाला, सरपंच परिषद, जिल्हा ग्रामसेवक युनियन, ग्रामरोजगार सेवक संघटना, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आदींनी पाठिंबा दिला होता.
संपा दरम्यान राज्यपातळीवर ग्रामपंचायत कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. यात नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आंदोलनात सहभागी होते.
संपापुर्वी राज्यातील जिल्हा ग्रामसेवक संघटनेची ऑनलाइन बैठक झाली होती. बैठकीत तीन दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रलंबित मागण्यांसाठी हे तीन दिवसीय आंदोलन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.