Former MLA Sanjay Chavan met Guardian Minister Dada Bhuse to demand that 40 modern buses should be procured for the depot here and concreting work should be done in the bus station premises. esakal
नाशिक

Nashik News: सटाणा आगाराला मिळणार अत्याधुनिक 40 बसगाड्या! दादा भुसेंची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : येथील बसस्थानकातून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सटाणा आगाराला लवकर नवीन अत्याधुनिक ४० बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येतील. बसस्थानक आवारात काँक्रिटीकरणाचे काम होईल.

त्यासाठी राज्याचे परिवहन तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिली. (Satana Agar will get 40 buses Approval of Dada bhuse Nashik News)

श्री. भुसे यांची रविवारी (ता. १७) श्री. चव्हाण, माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयराज वाघ आणि जिल्हा उपाध्यक्ष ज. ल. पाटील यांनी भेट घेत चर्चा केली.

श्री.चव्हाण म्हणाले, की ‘प्रवाशांच्या सोईसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्‍या सटाणा आगारातील नादुरुस्त बसगाड्यांमुळे सध्या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे.

बसगाड्या रस्त्यात कधीही बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. सटाणा आगारातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात.

त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाच्या सुस्थितीतील बसगाड्या असणे आवश्यक आहे. परंतु नादुरुस्त बसगाड्यांमुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाइलाजास्तव जीवघेण्या व महागड्या खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.

सटाणा आगाराला सटाणा आणि देवळा या दोन तालुक्यांसाठी सेवा द्यावी लागते. एसटी बसगाड्यांची धावण्याची मर्यादा १० वर्षे आणि १० लाख किलोमीटर असताना सटाणा आगारातील एकूण ७१ बसगाड्या १५ लाखांहून अधिक किलोमीटर अंतर धावल्या आहेत.

या सर्व बसगाड्यांचे आयुर्मान १५ वर्षे पूर्ण झाले आहे. सर्व फेऱ्या याच जुन्या बसगाड्यांनी होतात. बसगाड्या ‘ब्रेक डाऊन' होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्टिअरिंग ऑईल नाही, गिअर पडत नाहीत.

रेडीएटरमध्ये पाणी नाही. टायर्सची दुरवस्था, स्टार्टर खराब झाल्यामुळे धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट नसल्याने मशीन गरम होणे या बाबी नेहमीच्याच झाल्या आहेत. नवीन बसगाड्या नसल्याने लांब पल्ल्यासाठी जुन्या बसगाड्या वापराव्या लागत आहेत.

त्याचा त्रास विशेषत: वृद्ध, मुले आणि महिला प्रवाशांना होतो. या प्रकारामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. म्हणूनच तातडीने सटाणा आगाराला अत्याधुनिक ४० बसगाड्या मिळाव्यात. तसेच सटाणा बसस्थानकाची दुरवस्था झाली असून स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने आवारात धुळीचे साम्राज्य निर्माण होते.

त्यामुळे प्रवाशांना श्‍वसनाचे विकार जडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने संपूर्ण आवार जलमय होतो. त्यावर उपाय म्हणून बसस्थानक आवारात तातडीने काँक्रिटीकरणाचे काम करावे, असे श्री. भुसे यांनी सांगितल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT