Satana Municipality dhol tasha bhonga played in front of houses of arrears for tax recovery esakal
नाशिक

Nashik News: सटाणा पालिकेची ‘गांधीगिरी’! थकीत मालमत्ताधारकांच्या घरांसमोर वाजविला ढोलताशा, बॅंड अन् भोंगा

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : येथील पालिका प्रशासनाने यंदा कर वसुलीचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या वसुली पथकाने गेल्या काही वर्षांपासून कर चुकविणाऱ्या शहरातील निवडक मालमत्ताधारकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या घरांसमोर जाऊन ढोलताशा, बॅंड व भोंगा वाजवून कर वसुली सुरु केली आहे.

या आगळ्यावेगळ्या गांधीगिरीमुळे थकीत मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे. या उपक्रमाचे नियमित कर भरणाऱ्या शहरवासीयांनी स्वागत केले आहे. (Satana Municipality dhol tasha bhonga played in front of houses of arrears for tax recovery Nashik News)

गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने शहरातील मालमत्ताधारकांकडून पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करून कर वसुलीचे उदिष्ट पूर्ण करण्यात यश मिळवले होते. यावर्षी मात्र चित्र उलटे दिसू लागल्याने पालिका प्रशासनाला उदिष्ट पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

यावर उपाय म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागूल व वसुलीसाठी नियुक्ती केलेल्या विशेष पथकाने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यालाही काही थकीत मालमत्ताधारक दाद नसल्याने मुख्याधिकारी बागूल यांनी आगळीवेगळी युक्ती शोधून करवसुली सुरु केली.

ढोल ताशे बजावमुळे व अप्रत्यक्षपणे थकबाकीदारांना टार्गेट केले जात असल्याने वसुलीचे प्रमाण वाढले आहे. काही थकीत मुजोर थकबाकीदारांना जाग आणण्यासाठी पालिका प्रशासनाने हा उपक्रम सुरु केला आहे.

या पथकाने थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर बॅंड, भोंगे तसेच ढोलताशा बडवून प्रत्यक्ष कर भरणा करीत नाही, तोपर्यंत दररोज एकवेळेस घरासमोर हा वाद्य वादनाचा प्रकार सुरूच ठेऊन थकबाकीदारांची जागृती केली जात आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

थकबाकीदार मालमत्ताधारकांनी येत्या दोन दिवसात थेट पालिकेच्या वसुली विभागात येऊन करभरणा करावा अन्यथा त्यांच्या नळ जोडण्या तत्काळ बंद करून मालमत्ताही जप्त केल्या जातील असे मुख्याधिकारी नितीन बागूल यांनी स्पष्ट केले.

कर वसुली मोहीमेत कर निरीक्षक कैलास चव्हाण, सहाय्यक कर निरीक्षक निषाद सोनवणे, मालमत्ता पर्यवेक्षक निवृत्ती कुवर, वसुली झोनप्रमुख दुर्गेश गायकवाड, इस्माईल शेख, बाळासाहेब देवरे, धनंजय सोनवणे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी सहभागी आहेत.

चौकाचौकत थकबाकीरांचे डिजिटल फलक

थकीत मालमत्तांच्या नळ जोडणी तोडण्यात येऊन कारवाई दरम्यान येणाऱ्या काळात अनिवासी मालमत्ता व नगरपरिषद मालकीच्या गाळे भाडेकरूंना जप्ती वॉरंट बजावून मालमत्ताही सील केल्या जातील. यानंतर थकबाकीधारकांची नावे असलेला डिजिटल फलक शहरातील चौकाचौकात लावून प्रसिद्ध केले जाणार आहे.

"शंभर टक्के वसुलीचे शासनाचे आदेश आहेत. अनेक थकबाकीदार पालिकेत येऊन थकबाकी जमा करीत आहेत. मात्र काही थकबाकीदार टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्या घरासमोर ढोलताशा वाजवून, नळजोडण्या तोडून वसुली केली जात आहे. कराची थकबाकी न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे." - नितीन बागूल, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT