सटाणा : एलईडी पथदीप रुपांतरण कामात १ कोटी ६० लाख रुपयांची बचत करीत सटाणा नगरपालिका राज्यात एकमेव ठरली आहे. १५.५ चौरस किलोमीटर परिसराच्या सटाणा शहरातील ८ हजार ४३१ मालमत्तांना जोडणारे ८८ किलोमीटर लांबीच्या विद्युत लाइनवर सर्व नवीन एलईडी पथदीप बसविण्यात आले आहेत.
त्यासाठी शासनमान्य दराचे २ कोटी२५ लाख रुपयांचे एलईडी पथदीप रुपांतरणाचे काम सटाणा नगरपालिकेने स्वनिधीतून अवघ्या ६५ लाख रुपयात पूर्ण करीत १ कोटी ६० लाख रुपये वाचवले. (Satana Municipality tops state in energy saving 65 lakhs completed LED street lamp conversion work Nashik News)
उर्जा बचतीसाठी महाराष्ट्र शासनाने जून २०१७ मधे उर्जा संवर्धन धोरण जाहीर करून सर्व नगरपालिका व महापालिकांना पथदीपसाठी फक्त एलईडी पथदीप घेण्याचे बंधन होते.
मात्र सटाणा नगरपालिकेने जुन्या तंत्रज्ञानाचे पिवळसर प्रकाश देणारे २५० व्हॅटचे सोडियम व्हेपर लॅम्प व १५० व्हॅटचे मक्युरी व्हेपर लॅम्प आणि ११० व्हॅटचे फ्लोरोसन्ट ट्युब पिक्चर सेट, ७५ व्हॅटचे सीएफएल ट्युब फिक्चर सेट बदलून ४५ व्हॅट इतक्या कमी उर्जेत जास्त व पांढरा प्रकाश देणारे एलईडी पथदीप रुपांतरणाचे काम मार्च २०१६ पासूनच प्रत्यक्षात सुरु केले होते.
जानेवारी २०१८ मधे शासनाने पुन्हा एक निर्णय घेऊन नगरपरिषद व महापालिकांनी कोणत्याही शासकीय निधीतून पथदीप खरेदी न करता फक्त शासनाने करार केलेल्या इइएसएल कंपनी कडूनच पथदीप खरेदी करण्याचे बंधन घातले.
त्यानुसार या कंपनीने महाराष्ट्रातील सर्व पालिकांना त्यांचे प्रस्ताव पाठवले. त्यात सटाणा शहरातील पथदीप रुपांतरण व अनुषंगिक कामांसाठी १२.५ टक्के फ्लॅट व्याजदराचा व प्रतिमाह २ लाख ६२ हजार रुपयांचे ८६ परतफेड हप्तांचा रुपये २ कोटी २५ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला.
शासन प्रस्तावाचा सटाणा नगरपरिषद विद्युत विभाग प्रमुख हिरालाल दत्तात्रेय कापडणीस यांनी सखोल अभ्यास करून कंपनीचा प्रस्ताव तीनपट महाग असल्याचा व नगरपरिषदांच्या हिताचा नसल्याचा अहवाल तयार केला.
तत्कालीन नगराध्यक्ष सुनील मोरे यांना प्रस्ताव सादर केला असता त्यांनीही हा विषय सकारात्मक घेऊन तत्काळ विषय पत्रिकेत घेऊन सभागृहाची मान्यता घेतली.
पालिकेने मार्च २०१६ मधे सुरु केलेले एलईडी पथदीप रुपांतरणाचे हे काम निधी उपलब्धतेनुसार ७ वर्षात २१ टप्प्यात ६५ लक्ष रुपयात पूर्ण करून शासनाचे १ कोटी ६० लाख रुपयांची बचत केली आहे.
उर्जा बचतीसाठी शासन पुरस्कृत एस्सेल कंपनी कडूनच खरेदी करण्याचे शासन निर्णयांचे बंधन असताना, त्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास केल्याने कायदेशीर दुसरा पर्याय शोधला. यामुळे सटाणा पालिकेचे २ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाचली.
-हिरालाल कापडणीस, विद्युत विभाग प्रमुख,
"शासन निर्णयांच्याही आधी उर्जा बचत करणारे पथदीप रुपांतरणाचे काम सुरु करून १ कोटी ६० कोटी रुपयांची बचतही करणे हे संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श निर्माण करण्याचे काम पूर्णत्वास नेण्याची संधी मिळाली."- नितीन बागुल, मुख्याधिकारी, सटाणा पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.