सातपूर (जि. नाशिक) : दुचाकीचे सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करीत गाडी चालविल्यामुळे सर्वांनाच ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत आहे. यामुळे पोलिस आयुक्तांनी रेसर बाईकसह अशा गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सातपूर पोलिसांनी सुमारे १३ लाखाच्या रेसर बाईकस्वारावर कारवाई करत पहिला झटका दिला आहे. (Satpur police action against 13 lakh bikers Racer bike seized Nashik Crime News)
सातपूरला काही तरुण रेसर गाड्या भरधाव वेगाने रस्त्यावर चालवत असल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याची तक्रार आल्या होत्या. ९ जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास सातपूर परिसरात (एमएच-१२- एनएफ- २५३८) ही रेसर बाईक एकजण अतिशय जोरात आणि कर्कश आवाज करीत सातपूर परिसरात चालवीत होता.
सामान्य नागरिकांची शांतता भंग होऊ नये म्हणून याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेत कायदेशीर कारवाई केली आहे.
अशा प्रकारचे वाहन रहिवासी आणि सातपूर परिसरात जोरजोरात आवाज करून फिरवल्यास प्रत्येकावर कठोर शासन केले जाईल, असे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.