While felicitating Rabindranath Savdekar at Chandwad, Principal Dr. Bhaskar Dhoke, Dr. Shankar Borhade. esakal
नाशिक

Nashik : माणूस घडवायला गेलेला शिक्षक 17 वर्षांनंतर परतला मूळ गावी

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : ‘माणसात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण.’ (एज्युकेशन इज द मॅनीफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन द मॅन) ही वाक्य आयुष्याची ध्येय मानत चांदवड (जि. नाशिक) येथील तरुण शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमासाठी पुण्यात गेला. विवेकानंद केंद्राने आसाम राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला अन्‌ त्यासाठी या तरुणाची निवड केली.

तरुणाने कुठलाही विचार न करता जाण्याचा निर्णय घेतला अन्‌ १७ वर्षांत एक नव्हे तर तीन ठिकाणी शिक्षणाची गंगा नेत अध्यापनाचे कार्य केले व करीत आहे. पाल्याच्या भेटीसाठी सतरा वर्षांपासून आस लावून बसलेल्या माता-पित्यांच्या भेटीला तरुण गावी आला अन्‌ कुटुंबाची दिवाळी गोड झाली. तो तरुण म्हणजे चांदवडचे रवींद्रनाथ देवेंद्रनाथ सावदेकर. (Savdekar sweet Diwali with arrival of Ravi sir nashik news)

रवींद्रनाथ सावदेकर यांचे वडील देवेंद्रनाथ सावदेकर आणि आई अर्चना हे शिक्षण क्षेत्रातच कार्यरत होते. सावदेकरसरांनी देवळा येथील विद्यानिकेतन शाळेत दीर्घकाळ अध्यापनाचे कार्य केले. आई अर्चना या प्राथमिक शिक्षिका होत्या. रवींद्रनाथ यांना त्यांनी शिक्षणासाठी सर्व प्रकारची संधी उपलब्ध करून दिली. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सटाणा महाविद्यालयातून पदवीधर होऊन शिक्षणशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी रवींद्रनाथसर पुण्याला गेले. ब्रह्मपुत्रा नदीच्या परिसरात माजोली नावाचे बेट आहे.

सतत महापुराचा सामना करावा लागणाऱ्या या बेटावर विवेकानंद केंद्राने शाळा सुरू केली. या शाळेसाठी रवींद्रनाथ सावदेकर यांची निवड झाली. नाशिकच्या या शिक्षकाने माजोली बेटावर २५ हजार स्क्वेअर फुटाची शाळा उभारली. या शाळेसाठी दगड-विटांपासून तर मजुरांपर्यंत सर्व व्यवस्था रवींद्रनाथ यांनी आपल्या कौशल्याने केली. या भागातील माती मुरमाड असल्याने भूस्खलनाचा धोका सतत असतो.

प्रत्येक पावसाळ्यात अनेक घर वाहून जातात. तरी इथली माणसे काटकपणे पावसाचा सामना करीत उभे राहतात. अशा प्रतिकूल परिसरात रवींद्रनाथ सावदेकर यांनी शाळा उभारली आणि तेथे शिक्षणाची गंगा सुरू झाली. या बेटावर रवीसरांची शाळा म्हणून ती प्रसिद्ध आहे. या कार्यात पूर्वा रवींद्रनाथ सावदेकर यांनी त्यांना साथ दिली. माजोली येथे आठ-नऊ वर्षे उत्तम काम करून त्यांची बदली सिलचरला झाली. आता दिब्रुगड येथे कार्यरत आहेत.

आजकाल सरकारी माणसाची बदली जिल्ह्यात असल्यावर तालुक्यात पाहिजे असते, तालुक्यात असल्यावर गावात पाहिजे असते, गावात बदली झाल्यावर घराजवळ पाहिजे हे सरकारी माणसाची मानसिकता आहे. मात्र सोयीच्या आणि सुरक्षित ठिकाणी नोकरी करणाऱ्या माणसांपेक्षा रवींद्रनाथसर यांनी वेगळेपण सिद्ध केले आहे.

शिक्षक म्हणून आपले भरीव योगदान देताना सणवार, उत्सव कशाचाच विचार न करता स्वतःला त्या ठिकाणी वाहून घेतले. सतरा वर्षांनंतर चांदवड येथे आपल्या घरात आई-वडिलांसमवेत त्यांनी दिवाळी साजरी केली. रवींद्रनाथ गावी आल्याचे समजताच त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ढोके यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांचे समवेत प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे होते.

"कितीतरी माणसे ध्येयवेडाने काम करीत असतात. अशा माणसांनीच फार मोठे रचनात्मक काम उभे केले आहे."-रवींद्रनाथ सावदेकर

माझा नको माता-पित्यांचा करा

प्राचार्य भास्कर ढोके हे रवीसरांचा सत्कार करू लागताच ते म्हणाले, सत्कार माझा करू नका. माझ्या माता-पित्यांचा करा. एकुलत्या एक मुलाला त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला परवानगी दिल्याने असाममध्ये मी जाऊ शकलो.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

भावार्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.

याचा अर्थ असा, की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले, तरच भविष्यात सुफलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते, असे सांगितले जाते. रवींद्रनाथसरांनी सतरा वर्ष कुटुंबापासून दूर जात कर्मावर लक्ष केंद्रित केले अन्‌ वर्तमानात मेहनत व परिश्रम घेतले व घेत असून, आपल्या कार्यातून त्यांनी गावासाठीच नव्हे तर देशातील तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT