Seed News esakal
नाशिक

Nashik Agriculture News : फसवणूक वाढतेय...बियाणे खरेदीवेळी दक्ष राहा!

संतोष विंचू

Nashik News : शेतमालाचा भाव असो किंवा बियाणे, खते खरेदी...शेतकऱ्याची लूटमार ठरलेलीच आहे...त्यातच बियाण्यातील फसवणूक, लिंकिंग व काळाबाजार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे, हे प्रमाण वाढत चालले आहे.

त्यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची व दक्ष होण्याची गरज वाढली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये निकृष्ट उगवण क्षमता, बोगस बियाणे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर, बियाण्यांस खतांमध्ये लिंकिंग अशा घटना वाढल्याने शेतकऱ्यांना आता अधिक काळजी घेण्याची वेळ आली आहे. (Scams on rise be careful buying seeds Appeal to farmers Shops have been decorated seeds but due to rain they are still in dark Nashik News)

खरेदीवेळी अशी घ्या काळजी

खरेदी केलेल्या बियाण्याची विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी.यावर तारीख,शेतक-याचे नाव, पूर्ण पत्ता तसेच पावतीवर विक्रेत्याची व शेतक-याची सही असणे आवश्यक आहे. बियाण्याच्या पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये.

पिशवीवर किंमत नसल्यास, दुकानदार जास्त पैसे मागत असल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करता येते.

बियाण्याची पिशवी तिन्ही बाजूंनी आतून शिवलेली व वरच्या बाजूने प्रमाणपत्र अन सील लावलेले पहावे, प्लॅस्टिक बॅग असल्यास त्यावर माहिती तपासून घ्यावी. बियाणे खरेदी करताना लेबलवरील माहिती पाहावी.

लेबलवर पिकाचे नाव, जात, उगवणशक्ती, भौतिक व आनुवंशिक शुद्धता टक्केवारी, बियाणे चाचणी, तारीख, महिना व वर्ष, बीजप्रक्रियेला वापरलेले रसायन, बियाणे खरेदी बिलावर छापील बिल क्रमांक असणे गरजेचे आहे.

पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडताना लेबल व बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित ठेवावा. पेरणीनंतर टॅगसह रिकामी पिशवी, डबे व बिल जपून ठेवावे. मुदतबाह्य तसेच पॅकिंग फोडलेले सूटे बियाणे खरेदी करू नये.

वजनाविषयी शंका आल्यास ते वजन करून घ्यावे. बीटी कापसाचे कापूस बियाणे हे बोंडअळीस प्रतिकारक असल्याचे शेतक-यांनी समजून घ्यावे, बियाण्याची खरेदी शासनमान्य परवानाधारक विक्रेत्याकडूनच करावी असे आवाहन कृषी विभाग व शेतकरी हितचिंतक संघटना करत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कुणालाही करता येईल तक्रार

बियाण्याविषयी उगवण अडचणी, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारी असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी.यासाठी खरेदी पावतीसह इतर माहिती जपून ठेवावी.

बियाणे खरेदी करताना...

स्वतःचे नाव असलेली खरेदीची पक्की पावती घ्यावी. पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सहीची पावती घ्या.

परवानाधारकाकडूनच खरेदी करा

बियाण्याची वैधता तपासणी दिनांकापासून ९ महिने असते तर नूतनीकरण केलेल्या बियाण्याची वैद्यता ६ महिन्यांपर्यंत असते, याची खात्री करावी. पिशवीच्या लेबलवर दिलेली बियाण्याची उगवणक्षमता, भौतिकशुद्धता, चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक पहा.

प्रमाणित बियाण्याच्या खुणचिट्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी व बियाणे खात्रीलायक निघाल्याची खात्री होईपर्यत बिल जपून ठेवावे.

पेरणी करताना....

पिशवीच्या तळाकडील (खालच्या) बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे. बॅगवरील टॅग काढू नये.रिकामी पिशवी व काही बियाणे शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवा.

दोन वेगवेगळ्या लॉटचे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये. शेजारी-शेजारी पेरावा. जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी. पेरणीची तारीख लिहून ठेवावी. पेरणीनंतर ४ ते ७ दिवसात बियाण्याची उगवण झालेली दिसून येते.

"अनेक कंपन्या व वाण बाजारात उपलब्ध आहेत. किंबहुना काही दुकानदारही त्यांच्या पद्धतीनेच बियाण्यांची शिफारस करतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला अनुभव वापरावा. कृषी अधिकाऱ्यांचे व कृषी क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा.

ठराविक बियाण्यांची सक्ती कोणीही करू शकत नाही. टंचाईची परिस्थिती नसल्याने शेतकऱ्याने दक्षता बाळगावी. लिंकिंग घ्यावेच लागेल, वाढीव किमत दयावी लागेल असे प्रकार घडत असल्यास तत्काळ कृषि अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी."

- भारत दिघोळे, संस्थापक, कांदा उत्पादक शेतकरी संघटना, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT