Nashik News : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.
राज्यामध्ये परदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढवणे आणि जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. (Scheme for revival of old orchards in integrated horticulture development campaign Nashik)
परदेशी फळे, फुले, मसाला लागवड करणे आणि जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.
त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी सांगितले.
अनुदानाची मर्यादा- फुले लागवड : कट फ्लॉवर्स-अल्पभूधारक शेतकरी-हेक्टरी एक लाख रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल ४० हजार रुपये हेक्टरी), इतर शेतकरी- हेक्टरी एक लाख रुपये (एकूण खर्चाच्या २५ टक्के अथवा कमाल २५ हजार रुपये हेक्टरी).
कंदवर्गीय फुले : अल्पभूधारक शेतकरी- हेक्टरी दीड लाख रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल ६० हजार रुपये हेक्टरी), इतर शेतकरी-दीड लाख रुपये हेक्टरी (एकूण खर्चाच्या २५ टक्के अथवा कमाल ३७ हजार ५०० रुपये हेक्टरी).
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सुटी फुले : अल्पभूधारक शेतकरी- ४० हजार रुपये हेक्टरी (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल १६ हजार रुपये हेक्टरी), इतर शेतकरी-हेक्टरी ४० हजार रुपये (एकूण खर्चाच्या २५ टक्के अथवा कमाल १० हजार रुपये हेक्टरी).
मसाला पीक लागवड : बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिके- हेक्टरी ३० हजार रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल १२ हजार रुपये हेक्टरी), बहुवर्षीय मसाला पिके- हेक्टरी ५० हजार रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल २० हजार रुपये हेक्टरी).
परदेशी फळपीक लागवड : ड्रॅगनफ्रुट- हेक्टरी ४ लाख रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल एक लाख ६० हजार रुपये हेक्टरी), स्ट्रॉबेरी- हेक्टरी २ लाख ८० हजार रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल एक लाख १२ हजार रुपये हेक्टरी), अवॅकॅडो- हेक्टरी एक लाख रुपये (एकूण खर्चाच्या ४० टक्के अथवा कमाल ४० हजार रुपये हेक्टरी). जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन-हेक्टरी ४० हजार रुपये (एकूण खर्चाच्या ५० टक्के व कमाल हेक्टरी २० हजार रुपये).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.