School Nutrition Scheme News esakal
नाशिक

School Nutrition Diet : शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी 11 ठेकेदार पात्र

विक्रांत मते

नाशिक : आगामी शालेय शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या निवेदनात ११ ठेकेदार पात्र झाले असून, पूर्वीचा अनुभव लक्षात घेता कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी ठेकेदारांच्या कागदपत्रांसह किचन शेड व गोडाऊनची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या संदर्भातील अहवाल आयुक्तांना सादर केल्या जाणार आहेत. (School Nutrition Diet 11 contractors eligible to provide school nutrition diet Nashik News)

शालेय पोषण आहार पुरवठा करण्याची घोषणा झाल्यानंतर पहिल्या वेळेस १३ ठेकेदारांना आहार पुरवण्याचे काम दिले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याने त्याची रद्द करण्याची मागणी महासभेत करण्यात आली होती. महापालिकेसह प्रशासनाच्या पथकाने काही ठिकाणी तपासणी केली असता तथ्य आढळून आल्याने त्याला ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विरोधात काही ठेकेदारांनी न्यायालयात दावा दाखल केला. कोरोना दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आहार पुरवठ्याचे काम झाले नाही.

त्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन निविदा प्रक्रिया राबवताना बचतगटांना सामावून घेण्याची मागणी करण्यात आली. एकंदरीत सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर एक लाख १८ हजार विद्यार्थ्यांना उपोषण आहार पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २५ महिला बचतगटांना प्रत्येकी २००० मुलांना पोषण आहार पुरवठ्याचे काम दिले जाणार आहेत. त्यासाठी ३० निवेदन प्राप्त झाले आहे, यातून २५ धारकांची निवड केली जाणार आहे. यंदा निवडधारकांची निवड करताना किचन शेड गोडाऊन तसेच अन्य कागदपत्रे तपासण्यासाठी स्पॉट व्हिजिट केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwa: केजरीवालांना मोठा धक्का! दिल्ली सरकारच्या मंत्र्याने दिला राजीनामा; भाजपचं नाव घेत पक्षावर आरोप

बापाच्या जिवावर कॉन्‍ट्रॅक्‍टर झालेल्या नारळफोड्याने माझ्यासमोर उभं राहून दाखवावं; आमदार गोरेंचा कोणाला इशारा?

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

Chh. Sambhajinagar Crime : नऊ तोळे सोने मोडले दुसऱ्याच्या नावाने, यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळ्याची न्यायालयात माहिती

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT