सिन्नर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात अंडी, केळीचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना अंडी देण्यात येणार आहे. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असणारे फळ द्यावे, असे आदेशात म्हटले आहे. (School Nutrition Scheme Students will now get eggs or bananas State Government initiative to increase nutritional value nashik)
दिवाळीच्या सुटीनंतर आठवड्यातील एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, अंडा बिर्याणी व मांसाहार न करणाऱ्या विद्यार्थ्यांना फळे मिळणार आहेत. प्रतिविद्यार्थी पाच रुपयांप्रमाणे हा खर्च केला जाणार आहे. या योजनेत जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे.
तालुक्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या २२ हजार ४८३, तर सहावी ते आठवीचे १५ हजार ९ विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचा लाभ मिळणार आहे. नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या, आहार शिजविणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
शालेय पोषण आहाराच्या नव्या मेन्यूचा उपक्रम २३ आठवड्यांसाठी सुरू राहणार आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० कॅलरी, तर १२ ग्रॅम प्रोटिन आवश्यक असतात, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० कॅलरी व २० ग्रॅम प्रोटिनची आवश्यकता असते.
केंद्र सरकारच्या या योजनेत राज्य सरकारने प्रतिविद्यार्थी ५ रुपये प्रतिआठवडा मंजूर केले आहेत. जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांच्या बँक खात्यावर डिसेंबरअखेर परिगणना करून शाळेतील योजनेस पात्र विद्यार्थी संख्या विचारात घेऊन नुदान संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर पीएफएमएस प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
उपस्थिती न नोंदविल्यास अनुदानात कपात
शाळांनी नियमित आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद एमडीएम पोर्टलवर ऑनलाइन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अंडी अथवा फळांचा लाभ घेतला. मात्र, पोर्टलवर नोंद न झाल्यास अनुदान मिळणार नाही.
"राज्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री पोषणशक्ती शक्ती निर्माण योजनेंतर्गत नियमित पोषण आहारात अंडी व फळांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा आहार दिवाळीच्या सुटीनंतर सुरू करण्यात येणार असून, विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यास मदत होईल त्याबाबत सर्व शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत." -कैलास सांगळे, प्रभारी अधीक्षक, शालेय पोषण आहार/विस्ताराधिकारी, पंचायत समिती, सिन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.