Cyber Literacy : स्मार्ट फोनमुळे सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून वाढती गुन्हेगारी सामाजिक चिंतेची बाब आहे. या सायबर गुन्हेगारीला अटकाव घालण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती व प्रबोधनात्मक उपाययोजना राबविल्या जातात.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याच संकल्पनेतून नाशिक सायबर पोलिसांकडून शालेय विद्यार्थ्यांना सायबर साक्षरतेचे प्रशिक्षण महाराष्ट्र दिनी (ता. १) दिले जाणार आहे. (School students will be cyber literate Training by Cyber Police on Maharashtra Day nashik news)
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर सायबर गुन्हेगारीसंदर्भात विद्यार्थ्यांना साक्षरतेचे धडे देण्याचे संकेत दिले होते. स्मार्ट फोनमुळे ऑनलाइन बँकिंग, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंगचा वापर समाजात मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मात्र यातूनच सायबर गुन्हेगारी वाढली आहे. ऑनलाइन फसवणूक, मोबाईल हॉकिंग, डाटा चोरी, अश्लील चॅटिंग, व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करणे यासह टीमव्ह्यवर, ऐनी डेस्कसारखे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून बँक खात्यासह मोबाईलचा अॅक्सेस मिळवत परस्पर रक्कम काढून घेत आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहे.
अशा गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी सायबर पोलिस उपाययोजना व जनजागृती करीत असते. तरीही जागरुकतेअभावी फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. पोलिस आयुक्त शिंदे यांच्या सायबर साक्षरता व सायबरदूतची संकल्पनेचा सोमवारी (ता. १) सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शहर पोलिस मुख्यालयाच्या भीष्मराज सभागृहात सायबर जनजागृती कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
या वेळी शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे व सायबरचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयीन असे ३०० शिक्षक व विद्यार्थी सायबरदूतचे प्रशिक्षण घेण्यासाठी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सामाजिक जनजागृती
या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना सायबर तज्ज्ञ, वरिष्ठ अधिकारी व अंमलदार मार्गदर्शन करतील. प्रशिक्षित सायबर दूत शहरातील नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर साक्षर करतील.
‘सायबरदूत’चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र व ‘सायबरदूत’ चा बॅच देण्यात येणार आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी विविध ठिकाणी सायबर जनजागृती कार्यक्रम करून व्याख्यान देतील.
सायबर पोलिसांचे आवाहन
ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (NCCRP) वरील www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर आणि सायबर हेल्पलाइन नंबर 1930 यावर तक्रार नोंदवावी. तसेच, नजीकच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.