Sea Food esakal
नाशिक

Sea Food: वाढत्या थंडीमुळे मासळीची बाजारपेठ तेजीत; खवय्यांच्या खिशाला भार

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पसरली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून पौष्टिक आहारासह मासांहार व ओल्या-सुक्या मासळीच्चा आहाराला प्राधान्य देत असल्याने मागणी वाढल्याने मासळीच्या दरात प्रतिकिलो ३०० ते ४०० रुपयांची दरवाढ झाली आहे. मासांहारवर ताव मारणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

डिसेंबर व जानेवारीत जोरदार थंडीचे आगमन होत असते. त्यामुळे सर्वत्र मांसाहार करणाऱ्यांची मागणी वाढली आहे. चिकन, मटण आणि मासळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे मासळीचे दर वाढले आहेत. दोन वर्षे करोनामुळे सण-उत्सव कोरोना नियमांच्या चौकटीत राहून साध्या पद्धतीने साजरे केले जात होते.

मात्र यंदाचा नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत कोरोनामुक्त नियमातून साजरी झाले. त्यामुळे अजूनही लहान-मोठ्या पार्ट्यां होत आहेत. मासळी, मटण आणि चिकनचा पुरवठा वाढल्याने दरवाढ झाल्याचे मत मासळी विक्रेता सोमनाथ कोळी यांनी व्यक्त केले.

समुद्री मासळीमध्ये पॉपलेट, पिवळी वाम, काळी वाम, सुरमई आणि कोळंबीला आधिक पसंती दिली जाते. त्यामुळे यांच्या घाऊक दरात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सुरमई प्रतिकिलो ५०० रुपयांनी उपलब्ध होती. ती आता ७०० ते ८०० रुपयांवर पोचली आहे. तर पॉपलेटही महागले आहेत.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

कोळंबी ४०० रुपयांवरून ६०० ते ६५० रुपयांवर उपलब्ध आहे. नवीन वर्ष स्वागत व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेली दरवाढ मात्र कायम आहे. यामुळे एकूणच खवय्यांना मांसाहार व मासळीवर ताव मारण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

असे आहेत मासळीचे दर (प्रतिकिलोसाठी ) :

पॉपलेट : १२०० रुपये

पिवळी वाम : ११०० ते १२०० रुपये

काळी वाम : ६००ते ८०० रुपये

सुरमई : ७०० ते ८०० रुपये

कोळंबी : ६०० ते ८०० रुपये

राणी मासा : ६०० ते ७०० रुपये

कटला : ३०० ते ३५० रुपये

रावस : ३०० ते ३५० रुपये

कोंबडा : २५० ते ३०० रुपये

झिंगा : ८०० ते ९०० रुपये

ओले बोंबील : २५० ते ३०० रुपये

बांगडा : २५० ते ३५०

नदीतील मुरी : ८०० रुपये

वेगळी चौकट

खेकडा : ४०० ते ६००रुपये

मटण : ६४० ते ७०० रुपये

चिकन (बॉयलर) : २४० ते २८० रुपये

चिकन (गावठी) : ४५० ते ६०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT