वणी (जि. नाशिक) : आद्य स्वंयभू शक्तिपीठ सप्तशृंग गडावरील श्री भगवती मंदीराच्या श्री कालभैरव टप्या परिसरातीस सीसीटीव्ही कॅमेरास चुना लावत; दोन दानपेटीतून श्री भगवती मंदिर परीसराच्या सुरक्षा रक्षकानेच पैसे चोरी करुन भक्षक बनल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान यावेळी दान पेटी बाहेर व दान पेटीत जळालेल्या चलनी नोटाही आढळून आल्या आहेत. याबाबत शनिवार ता. ४ रोजी कळवण पोलिसांत तब्बल वीस दिवसांनंतर सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (security guard of Shri Bhagwati Mandir on Saptashrungi Gad robbed money from danpeti Nashik Crime News)
आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री भगवती मंदिर परिसरातील विश्वस्त संस्थेने भाविक व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेल्या सी सी टी व्ही यंत्रणेचे कॅमेरे यांची दिशा बदलून कॅमेरास चुना लावलेला होता व दानपेटी असलेल्या परिसरात काहीतरी छेडछाड तसेच ठिकाणी जळालेल्या नोटा आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता.
मात्र कोणत्याही दानपेटीची फोडतोड झालेली नव्हती तसेच सील सलामत होते. त्यानुसार श्री भगवती मंदिर परिसरातील इतर व घटनास्थळी किमान दर्शनीय भागाचे सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली असता, श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे अंतर्गत कार्यरत असलेला सुरक्षा रक्षक सोमनाथ हिरामण रावते (वय ३० वर्ष) याने दान पेटी क्र. ४१ व ४२ यामधून काठीच्या सहाय्याने चलनी नोटा काढण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
तसेच काही चलनी नोटा काढण्यास यशस्वी होवून दानपेटीतून रक्कम चोरली असल्याचे, तदपूर्वी त्याने परिसरातील विविध सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर चुना लावून, त्याची दिशा बदलून सदरची चोरी केली असल्याची फिर्याद आज ता. ४ रोजी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी कळवण पोलिसांत दिली असून सुरक्षा रक्षक सोमनाथ रावते यावर चोरीची गुन्हा दाखल करण्यात आला असून कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम करत आहे.
दरम्यान घटनास्थळी जळालेल्या परिस्थितीत सापडलेल्या नोटांचा संबंध सदर गुन्हाशी आहे किंवा कसे ? याबाबत तपास यंत्रणा तपास करणार असल्याचे ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.