ropeway file photo esakal
नाशिक

Nashik News: वनसंपदेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ सस्थांची मदत घेणार; अंजनेरी रोप- वे विरोधावर तोडगा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अंजनेरी येथील प्रस्तावित रोप- वेमुळे परिसरातील दुर्मिळ वृक्ष, निसर्गसंपदा, पशू- पक्षांच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामाचा त्रयस्थ समितीमार्फत अभ्यास करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसह पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. (Seek help from expert bodies for forest resource study Anjaneri rope way solution to opposition Nashik News)

अंजनेरी ते ब्रह्मगिरी प्रस्तावित रोप-वेमुळे निसर्गसंपदा व पशु-पक्ष्यांच्या अधिवासाला धक्का पोहचणार आहे, त्यामुळे प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून आजच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली.

त्यासाठी यापूर्वी विविध माध्यमातून आंदोलनेही झाली. यापार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींची मते जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.१८) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

खासदार हेमंत गोडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह महसूल, वनविभाग, पर्यटन तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोप-वेच्या ऊभारणीसाठी दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १२ व १५ गुंठ्यांची जागा लागणार आहे. मात्र, रोप-वेमुळे अंजनेरी भागातील दुर्मिळ वनस्पतींमुळे हा भाग ‘इको-सेन्सेटीव्ह’ झोनमध्ये समाविष्ट आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिसरात गिधाडांचा अधिवास असून विविध पशूपक्षांचे वास्तव या भागात आहे. प्रस्तावित रोप-वेमुळे यासर्व बाबींची हानी होताना निसर्गालाही धक्का बसले, असे मत पर्यावरणप्रेमींनी बैठकीत मांडले. हे प्रकल्प रद्द करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

रोपवेसंदर्भातील सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व अन्य संस्थांकडून पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर अभ्यास केला जाईल.

या संस्थांकडून प्राप्त होणारा अहवाल व त्यांच्याशी विचारविनिमय करून रोप-वेसंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT