नाशिक : 30 जाने.ते 3 फेब्रु. दरम्यान जबलपूर येथे पाचव्या खेलो इंडिया खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याची मैदानी निवड चाचणी सांगली येथे आयोजित करण्यात आली होती. या चाचणी स्पर्धेतून राज्याचे प्रातिनिधिक संघ जाहीर करण्यात आले आहे.
या संघात यंदा " संस्कृती "नाशिकच्या वृषाली भोये आणि निशा वैजल या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी नाशिकच्या दोन मुलींनी राज्याचा संघात स्थान मिळविले आहे. (Selection of Vrishali Bhoye and Nisha Vaijal for Khelo India National Kho Kho Tournament nashik news)
वृषाली भोये हिची गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे. या आधी उस्मानाबाद येथील वरिष्ठ गट महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने उपविजेत्या भारतीय विमान प्राधिकरणचे प्रतिनिधीत्व केले होते.
तर डिसेंबर मध्ये प. बंगाल येथे झालेल्या 18 वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेत्या महाराष्ट्राच्या यशात तिचा मोलाचा वाटा होता.या शिवाय महिलांच्या खेलो इंडिया खो खो लीग स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघात तर मुलींच्या खेलो इंडिया खो खो लीग स्पर्धेतील उप विजेत्या महाराष्ट्राच्या संघात सुध्दा तिचा समावेश होता.
मुलींच्या सलग दोन खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणारी वृषाली ही नाशिकची पहिली महिला खेळाडू आहे. या वर्षातील वृषालीची हि पाचवी राष्ट्रीय स्पर्धा आहे.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
दोन वर्षापूर्वी एकाच वर्षी दोन राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी निशा हि नाशिकची पहिली खेळाडू होती. त्यानंतर दोन वर्षानंतर तिने पुन्हा एकदा खेलो इंडिया खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात स्थान पटकाविले आहे.
या दोन्ही खेळाडू श्रीराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी येथे शिक्षण घेत असून त्यांना गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नाशिक जिल्हा खो - खो असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचालित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे वर्षभर सकाळ- सायंकाळ त्या नियमीत सराव करत असतात.
त्यांच्या निवडी बद्दल जिल्हा खो- खो असो.अध्यक्ष विश्वास ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे," संस्कृती " नाशिकचे अध्यक्ष शाहू महाराज खैरे, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, खजिनदार सुनील गायकवाड आणि जिल्हा खो- खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.