Adv Shyam Barode, Dhanraj Chavan, Vikas Kulkarni, Jaywant Percent, Kavita Kaweeshwar etc. esakal
नाशिक

Nashik News: ज्येष्ठ नागरिक, महिला टवाळखोरांविरोधात आक्रमक; इंदिरानगरला छेड काढण्याचे वाढले प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इंदिरानगर परिसरात गेल्या तीन दिवसात चार युवती आणि महिलांसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या तसेच परिसरात नशाबाजी, गुंडगिरी आणि टवाळखोरी करणाऱ्यांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे यांच्याकडे केली. (Senior Citizens Aggressive Against Women Refugees Indiranagars harassment increased Nashik News)

माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४० ते ५० ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी याबाबत त्यांची भेट घेतली. तीन दिवसांपासून महिलांची छेड काढली जात आहे.

मंगळवारी (ता. १३) सकाळी आठच्या सुमारास शिव कॉलनी येथील रस्त्याने एक युवती जात असताना निळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या युवकाने तिला पाठीमागून मारून तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पोबारा केला.

असाच प्रकार अजून तीन महिलांसोबत झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या ठिकाणी जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मोकळ्या भूखंडांवर तसेच मैदानांवर सर्रास या टवाळखोरांचे घोळके जमा होतात. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात.

हटकले तर संबंधितांना अरेरावी, दमदाटी आणि वेळप्रसंगी मारहाण करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. काही दिवसांपूर्वी कलानगर चौकात एका ज्येष्ठ नागरिकाला अशाच एका टोळक्याने मोठा त्रास दिला होता.

अनेक महिला आणि युवती सामाजिक दबावापोटी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. पोलिसांनी संपूर्ण परिसरात विशेषतः सदिच्छा नगर, शिव कॉलनी, या भागात असलेली अभ्यासिका आदि ठिकाणी असलेल्या मोकळ्या भूखंडावर गस्त घालण्याचे प्रमाण वाढवण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सेच या टवाळखोरांना पोलिसी हिसका दाखवण्याची गरज असल्याचे सांगितले .मोकळ्या मैदानात तसेच उद्यानात असलेल्या ग्रीन जिमचे व्यायाम साहित्य, खेळण्या ,बसण्याची बाके साहित्याची देखील मोठ्या प्रमाणात हे टवाळखोर नासधूस करत आहेत.

पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा जनआंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. ॲड. बडोदे यांनी पोलिसांना नागरिकांच्या त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या परिसरातील ब्लॅक स्पॉट्स ची इत्थंभूत माहिती पोलिसांना दिली आहे.

वरिष्ठ निरीक्षक न्हायदे यांनी येत्या काही दिवसात या संपूर्ण टवाळखोरांचा बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन दिले आहे. या वेळी उपनिरीक्षक निखिल बोंडे, ज्येष्ठ नागरिक धनराज चव्हाण, विकास कुलकर्णी, चंद्रशेखर पोळ, दिलीप मुजुमदार, विवेक कवीश्वर, जयवंत टक्के, विनय महाले, सदाशिव उगले, आतिश कोलारकर, कविता कवीश्वर, स्वप्न पोळ, रूपाली सावंत, संजना पारखे, अंकिता पारखे, वैभवी कुलकर्णी, ॲड. मनीष पाटील, मंजूषा मुजुमदार, सुजित मोरे, अमित बुडूख आदींसह नागरिक आणि महिला उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT