indian post  esakal
नाशिक

Indian Post News: ज्येष्ठांचा ओढा टपाल खात्याकडे कायम! तरुणाईची पसंती मात्र शेअर्स, मॅज्युअल फंडाला

दत्ता जाधव

नाशिक : शेअर बाजार, मॅच्युअल फंड आदींमधील गुंतवणुकीत चांगला परतावा मिळत असतानाही आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी ज्येष्ठांचा कल टपाल खात्याकडेच असल्याचे स्पष्ट होते.

दुसरीकडे भरघोस रिटर्न्सची अपेक्षा असलेल्या तरुणाईची पसंती मात्र मॅच्युअल फंडाबरोबरच शेअर बाजाराला असल्याचे दिसून येते. (Seniors always flock to postal department youth prefers shares mutual funds nashik)

नव्वद सालापर्यंत पोस्टाच्या सर्वच योजनांवर चांगले व्याजदर होते. त्यानंतर या खात्याच्या मासिक प्राप्ती योजना, दामदुप्पट योजना (केव्हीपी), बचतीबरोबरच आयकरातून सूट मिळविण्यासाठी राष्टीय बचत पत्र (एनएससी), केवळ पाच वर्षांत दुप्पट परतावा देणारे इंदिरा विकास पत्र त्यानंतर २००४ पासून सुरू झालेली ज्येष्ठ नागरिक बचत योजना या सर्वच योजना प्रचंड लोकप्रिय होत्या.

त्या वेळी मासिक प्राप्ती योजनेत सहा वर्षांच्या मुदतीसाठी तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मासिक दोन हजार रुपये व्याज मिळत असे. शिवाय मुदतीअंती दहा टक्के भरघोस बोनसही गुंतवणूकदारांना दिला जात होता.

त्यामुळे या योजना कमालीच्या लोकप्रिय होत्या. कालांतराने केंद्र सरकारने या सर्वच योजनांच्या व्याजदरात घट केली. मात्र तरीही आजही ज्येष्ठांचा ओढा पोस्टातील गुंतवणुकीकडेच राहिल्याचे दिसून येते. ज्येष्ठांची पसंती भरघोस व्याजदरापेक्षा सुरक्षिततेकडे अधिक राहिली आहे.

त्यामुळे अधिक परतावा देणाऱ्या योजनांपेक्षा कमी का होईना पण हमखास व्याजदर देणाऱ्या पोस्टाच्या योजनांकडेच राहिल्याचे शहरातील सर्वच टपाल कार्यालयात फेरफटका मारला असता दिसून येते.

याउलट घसघशीत परताव्याची अपेक्षा असलेल्या तरुणाईला शेअर बाजार, मॅच्युअल फंडातील ‘एसआयपी’ कडे अधिक असल्याचे दिसून येते. १९९२ मध्ये जगाबरोबरच भारतानेही मुक्त अर्थव्यवस्थेचा अंगीकार केल्यावर सुरवातीला खासगी मॅच्युअल फंड बाजारात आले.

त्यानंतर भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी यांनीही या फंडाद्वारे गुंतवणूक स्वीकारण्यास सुरवात केली. चांगले व्याज मिळत असल्याने आज तरुणाईचा ओढा याकडे राहिल्याचे दिसून येते.

"आज गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असलेतरी ज्येष्ठांचा ओढा मात्र पारंपारिक गुंतवणुकीकडे म्हणजे टपाल खात्याकडेच राहिल्याचे दिसून येते. खात्याच्या एससीएसएस, केव्हीपी, एनएससी, मुदत ठेव, सुकन्या समृद्धी, महिला सन्मान या योजना कमालीच्या लोकप्रिय आहेत."

- प्रफुल्ल वाणी, अधिक्षक, टपाल कार्यालये, नाशिक

"ज्येष्ठांचा ओढा नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो. मात्र तरुणांकडे ज्येष्ठांइतका संयम नसतो, त्यांना झटपट रिझल्ट हवा असतो. त्यामुळे नव्वद टक्के तरुणांचा कल सहाजिकच अल्पकाळात अधिक परतावा देणाऱ्या मॅच्युअल फंडातील एसआयपीकडे अधिक आहे."

- अरुण काथे, गुंतवणूक सल्लागार

"व्याज कमी मिळाले तरी चालेल, परंतु आयुष्याच्या या वळणावर कोणतीही ‘रिस्क’ नको, अशी माझ्यासह सर्वच ज्येष्ठांची मानसिकता आहे."- दौलतराव सरोदे, सेवानिवृत्त बॉश कर्मचारी

टपाल खात्याच्या विविध योजना (व्याजदरासह)

------------------------------------------------------------------------------------------------

क्रम योजनेचे नाव सध्याचा व्याजदर मुदत जास्तीत जास्त गुंतवणूक

------------------------------------------------------------------------------------------------

रिकरिंग डिपॉझिट (आरडी) : ६.७० ५ वर्षे मर्यादा नाही

सिनिअर सिटीझन्स योजना : ८.२० ५ वर्ष ३० लाख

मासिक प्राप्ती योजना : ७.४० ५ वर्ष ०९ लाख

राष्टीय बचत पत्र : ७.७० ५ वर्ष मर्यादा नाही

किसान विकास पत्र : ७.५० ९ वर्षे ७ महिने (दामदुप्पट)

सार्वजनिक भविष्यनिर्वाह योजना : ७.१० १५ वर्षे वार्षिक १.५० लाख

सुकन्या समृद्धी योजना : ८.०० २१ वर्षे वार्षिक १.५० लाख

महिला सन्मान योजना : ७.५० ०२ वर्षे २ लाख

मुदतठेव (१,२ व ५ वर्षे) : ९.९० ते ७.५० --- मर्यादा नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT