Nashik News : पिंगळवाडे (ता.बागलाण) येथील जुन्या जानकार व्यक्तींनी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या जुन्या संबळ वाद्यावर टिपरी नृत्य करून आपल्या आठवणींना उजाळा दिला. (Seniors performed Tipri dance to the beat of sambal nashik news)
आजच्या धावपळीच्या युगात बँड व डीजेच्या काळात पारंपारिक सभळ वाद्य नामशेष होण्याचा मार्गावर असले तरी ठराविक गावांमध्ये आता हे वाद्य असून मात्र आज कोणीही विचारत नाही. याबरोबरच ग्रामीण भागात टिपरी, लेझीम इत्यादी नृत्य प्रकार सुद्धा पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पिंगळवाडे गावात आजही लग्न समारंभाच्या आदल्या दिवशी मांडव मिरवणुकीच्या कार्यक्रमात संबळ वाद्य आवर्जून वाजवले जाते. तसेच त्याबरोबर मांडव मिरवणुकीच्या वेळेस संबळच्या तालावर गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक पद्धतीने टिपरी नृत्यही आवर्जून करतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पिंगळवाडे गावाची विशेष बाब मांडव समारंभ कोणाचाही असो गावातील प्रत्येक पुरुष मंडळी आवर्जून उपस्थित राहतात व मांडव समारंभ घरी जाण्यापूर्वी संबळच्या तालावर मनसोक्त आनंद साजरा करतात.
या पारंपरिक नृत्यात तरुणांना संधी नाही. हे नृत्य पाहण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र जमा होते आणि या आनंद उत्साह पाहून मन प्रसन्न होते.
"संबळ वाद्यावर जून्या जाणकारांना नृत्य करणे आवडते. नवीन बॅन्ड, डीजेच्या तालावर नृत्य करणे अवघडच असते. आमच्या गावात संबळ आले की टिपरी नृत्य सहभागी होतो. दुसऱ्या वाद्यावर नृत्य करता येत नाही." -दिलीप भामरे, पिंगळवाडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.