Pimpalgaon Baswant: Satish More, Bapusaheb Patil, Chindhu Kale etc. while starting the work of the street lamp to be installed on the service road of the highway esakal
नाशिक

Nashik News : पिंपळगावचा सर्व्हिस रोड पथदीपांनी लखलखणार

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरालगतचा महामार्गा साकारून पंधरा वर्षे लोटली. पण महामार्गाच्या सर्व्हिस रोड पथदीपांअभावी अंधारात बुडायचा. अपघातासारख्या दुर्घटना व्हायच्या. सर्व्हिस रोडवर पथदीप बसवावेत, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजपचे युवानेते सतीश मोरे, बापूसाहेब पाटील यांनी केली होती.

त्या प्रयत्नांना यश आले असून सर्व्हिस रोडसाठी पथदीप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड पथदीपांनी लखलखणार आहे. (Service road of Pimpalgaon will be lit up with street lights Satish More Bapusaheb Patil efforts successful Nashik News)

पिंपळगाव टोल प्लाझा ते वणी चौफुलीपर्यत महामार्गाच्या दुतर्फा असलेले सर्व्हिस रोडला पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असायचे. मुख्य महामार्ग व उड्डाणपुलावर पथदीप असल्याने रात्रीच्या वेळीही प्रवास सुरक्षित व झोकात व्हायचा. पण सर्व्हिस रोडवरून जाताना अंधारामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.

अनेकदा अपघाताच्या दुर्घटना घडून वाहनचालक जखमी झाले होते. याबाबत भाजपचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या पथदीप संदर्भात मागणी केली होती. मंत्री डॉ. पवार यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तातडीने पथदीप उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार महामार्ग प्राधिकरणाकडून पथदीप उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. भाजपचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, चिंधू काळे, अल्पेश पारख, प्रशांत घोडके, संदीप झुटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

"पथदीपाअभावी सर्व्हिस रोडवर अंधाराचे साम्राज्य पसरायचे. त्यातून अपघात होऊन नागरिक जखमी होत होते. मंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे कैफियत मांडली. त्यांच्या प्रयत्नामुळे पथदीप बसविण्याच्या कामाला सुरवात होत आहे. नागरिकांचा प्रवास रात्रीच्या वेळीही सुरक्षित होणार आहे."

-सतीश मोरे, बापूसाहेब पाटील (युवानेते, भाजप)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT