इगतपुरी : राज्यभरातील पेसा म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची भरतीच न झाल्यामुळे ७ हजार १८७ पदे रिक्त आहेत. अनुसूचित क्षेत्रात व बिगर अनुसूचित क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दरवर्षी बदली, सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे रिक्त होणाऱ्या पदांपैकी अनुसूचित क्षेत्रात रिक्त होणारी पदे, जास्तीत जास्त एकूण रिक्तपदांच्या २० टक्के पदे दरवर्षी स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरावयाची आहेत.
शिक्षकांची पदे रिक्त असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीतून अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी होत आहे. (Seven thousand vacant posts of teachers in professional sector Give preference to fill posts in teacher recruitment Twenty percent preference for recruitment from local tribes Nashik News)
आधारसिडिंगनंतर ३० टक्के भरती
चालू वर्षात राज्यभरात नवीन निर्देशानुसार ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्थ व नियोजन खात्याने आगामी शिक्षकांच्या ८० टक्के भरतीला मंजुरी दिली आहे. त्यापैकी ५० टक्के पदे तातडीने भरण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण विभागाने केली आहे. ५० टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच होणार आहे.
सध्या आधारकार्ड लिंकिंग सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची निश्चित संख्या ठरेल आणि त्यानंतरच ३० टक्के भरती होणार आहे. पुढील काळात वित्त विभागाची परवानगी मिळाली तर शंभर टक्के भरती करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने दर्शवली आहे.
अशी आहेत माध्यम निहाय रिक्तपदे
जिल्हा : मराठी : उर्दू :
● नाशिक : ४१७ : ०३
● नंदुरबार : ३०० : ३१
● धुळे : ५३ : ०७
● जळगाव : १८२ : १२
● अहमदनगर : २८ : ००
● पालघर : ४४८१ : ३६
● अमरावती : १६५ : १४
● गडचिरोली : २६५ : ००
● नांदेड : १२६ : ००
● पुणे : १७ : ००
● ठाणे : ५३३, १४
● यवतमाळ ५०३ : ००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.