नाशिक : हाउज द जोश...अवघ्या चार तासांत आनंदवली येथील 69 वर्षीय आजीसोबत पाच वर्षीय नातवाने हरिहर किल्ला केला सर. गडकिल्ले सर करायचे म्हटलं तर भल्याभल्यांच्या नाकीनव येतात. पण या आजी नातवाच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
आजी-नातवाचे तोंड भरून कौतुक
नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड हा प्राचीन काळातील किल्ला समुद्रसपाटीपासून 1,120 मीटर उंचीवर उभा असलेला त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे. तरुण मंडळींनादेखील हरिहरगड बघून घाम फुटावा असा गड. एकदा वरती चढत गेला तर मागे वळून बघणाऱ्याला चक्कर यावी, इतका त्याचा चढ अवघड. मात्र, अंबाडे आजींनी सर्व कुटुंबीयांसोबत कुठलाही आधार न घेता संपूर्ण गडाची चढाई केली आहे. आजींसोबत पाच वर्षीय नातू मृगांश अंबाडे या चिमुरड्यानेदेखील हरिहर किल्ल्याची चढाई केल्याने अनेकांनी आजी-नातवाचे तोंड भरून कौतुक केले.
धैर्याचे आणि उर्जेचे कौतुक
हरिहर किल्ला सर करतेवेळी अनेक ठिकाणी माकडे, आजूबाजूला रंगबिरंगी फुले, दाट हिरवळ यामुळे सारा आसंमत एक झाला होता असे भासत होते. या किल्ल्यामुळे जिवंतपणीच स्वर्ग बघायला मिळाला असे आजींनी सांगितले. इतके निसर्गसौंदर्य की कोणीही मोहीत होईल. तरुणांना लाजवणारा असा क्षण होता. अनेक गिर्यारोहकांना आजींसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. उतारवयात आल्यावर अनेकांना पायांच्या व्याधी जडतात यामुळे चालणेदेखील मुश्किल होते. अंबाडे आजींनी चार तासांत गडाची चढाई केल्याने अनेकांकडून त्यांच्या धैर्याचे आणि उर्जेचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा > दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा
किल्ला चढतांना मनात कुठलीही भीती नव्हती. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या किल्ल्याच्या चढाईने स्वर्ग सुखाची प्राप्ती झाल्याची प्रचिती आली. पहिल्यादांच एवढा उंच किल्ला सर करत असताना थकवादेखील जाणवला नाही. - आशा अंबाडे
हेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.