NMC Notice esakal
नाशिक

Nashik News : ग्रामपंचायतींचे सांडपाणी नाले गोदावरी नदीत! चांदशी ग्रामपंचायतीला नोटीस

गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडून ‘नमामि गोदा’ प्रकल्प साकारला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडून ‘नमामि गोदा’ प्रकल्प साकारला जात आहे. त्यासाठी जवळपास दोन हजार कोटींचा आराखडा सादर केला जाणार आहे.

परंतु एकीकडे करोडो रुपये खर्च करून प्रकल्प साकारला जात असताना दुसरीकडे चांदशीसह अन्य ग्रामपंचायतींचे सांडपाण्याचे नाले गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याचे मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीतून आढळून आले.

यामुळे चांदशीसह सांडपाणी मिसळणाऱ्या ग्रामपंचायतींना नोटीस बजावली जाणार आहे. (Sewage drains in Godavari river Notice to Chandshi Gram Panchayat Nashik News)

नदीप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडणे महापालिकेवर बंधनकारक आहे. महापालिकेने जलसंपदा विभागासमवेत तसा करारच केला आहे.

यासाठी महापालिकेने सहा सिव्हरेज झोन तयार केले असून, तपोवन येथे १३० एमएलडी, आगर टाकळी येथे ११० एमएलडी, चेहेडी येथे ४२ एमएलडी तसेच पंचक येथे ६०.५ एमएलडी अशाप्रकारे ३४२. ६० एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारले आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन नियमांनुसार ३० बीओटी क्षमतेनुसार या मलनिस्सारण केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. बदलत्या काळात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषणासंदर्भात नियमावली अधिक कठोर केली.

त्यानुसार मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त सांडपाण्याची मर्यादा १० बीओटीच्या आतच असावी असा दंडक घातला. त्यामुळे महापालिकेने ३० बीओटी क्षमतेनुसार उभारलेली मलनिस्सारण केंद्रे कालबाह्य ठरली.

त्यातच शहराच्या वाढता विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येमुळे ही मलनिस्सारण केंद्रे अपुरी पडत असल्यामुळे या मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण आणि क्षमतावाढ करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली.

पहिल्या टप्प्यात तपोवन आणि आगरटाकळी येथील मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ आणि आधुनिकीकरण केले जाणार आहे. यासाठी ३२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. तसा प्रस्ताव राज्याच्या तांत्रिक समितीकडे महापालिकेने पाठविला.

समितीने या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर तपोवन केंद्रासाठी १३० कोटी ५२ लाख, तर आगर टाकळी केंद्रासाठी १०७ कोटी अशा दोन प्रकल्पांसाठी २३७.७१ कोटींच्या प्रस्तावाला अमृत २.० मधून या निधीला नगरविकास विभागाने मंजुरी दिली.

त्याचबरोबर नमामि गोदा प्रकल्पांतर्गतदेखील प्रस्ताव सादर केला जाणार आहे. परंतु महापालिकेला आर्थिक वाटा म्हणून पन्नास टक्के निधी खर्च करावा लागेल. त्यामुळे राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पातून प्रकल्प साकारण्याचे प्रयत्न आहे. जेणेकरून महापालिकेवरील आर्थिक खर्चाचा भार कमी होईल.

अन्य ग्रामपंचायतींच्या हद्दीत सर्वेक्षण

शहरालगत चांदशी, एकलहरे, पळसे, शिंदे या ग्रामपंचायती आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या एका पाहणीमध्ये चांदशी ग्रामपंचायतीच्या सांडपाण्याचे नाले गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने चांदशीला नोटीस पाठविली जाणार आहे.

त्याचबरोबर अन्य ग्रामपंचायतींच्या हद्दीत सर्वेक्षण करून सांडपाण्याचे नाले गोदावरीसह उपनद्यांमध्ये मिसळत असल्यास त्या ग्रामपंचायतींनादेखील नोटीस बजावली जाणार आहे.

"चांदशी ग्रामपंचायतीकडून गोदावरी नदीत सांडपाण्याचे नाले मिसळत असल्याचे एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. त्यामुळे चांदशी ग्रामपंचायतीला नोटीस बजावली जाणार आहे."- संजय अग्रवाल, अधिक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT