Mahavitaran esakal
नाशिक

Nashik News : शहा- वावी वीजवाहिनीचे काम रेंगाळले; 8 दिवसात वीज जोडणीची घोषणा हवेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दोन महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात भूमिपूजन झालेल्या शहा ते वावी या उच्च दाब वीज वाहिनीचे काम रखडल्यामुळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी व पाथरे या वीज उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.

भूमिपूजनावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुढच्या आठ दिवसात शहा येथील १३२ किलोवॉट क्षमतेच्या वीज केंद्रातून वावी व पाथरे येथील वीज उपकेंद्र जोडली जातील अशी घोषणा केली होती.

मात्र महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे हे काम रखडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. (Shah Wavi power line work delayed Notification of electricity connection required within 8 days Nashik News)

सिन्नरच्या पूर्व भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी शहा येथे १३२ किलोवॉट क्षमतेचे वीज उपकेंद्र आमदार कोकाटे यांच्या पाठपुराव्यामुळे डिसेंबर महिन्यात कार्यान्वित झाले आहे.

या केंद्रातून वावी व पाथरे येथील उपकेंद्रे जोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर निविदा काढण्यात आली होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वावी येथे या वीजवाहिनीच्या कामाचा शुभारंभ आमदार कोकाटेंच्या हस्ते करण्यात आला होता.

त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना श्री. कोकाटे यांनी पुढच्या आठ दिवसात दोनही वीज उपकेंद्र शहा येथून जोडण्यात येतील अशी ग्वाही दिली होती. आमदारांच्या या आश्वासनामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मात्र, दोन महिने उलटूनही प्रत्यक्षात काम मार्गी लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. ठेकेदाराकडून या कामात काहीसा उशीर झाला असे समजून सर्वजण वीज वाहिनीचे काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत होते. गेल्या महिन्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहा येथे शेतकरी मेळावा पार पडला.

त्याचवेळी १३२ किलोवॉटच्या वीज केंद्राचे लोकार्पण देखील करण्यात आले. याच कार्यक्रमात वावी व पाथरे येथील उपकेंद्रांना वीजपुरवठा सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, तोदेखील मुहूर्त टळला.

वीज वाहिनीचे काम शहा ते वावी रस्त्याच्या कडेने मार्गी लावावे. या कामात अडथळे आणणाऱ्या शेतकरी अथवा संबंधित व्यक्तींना पोलिसांमार्फत समज द्यावी अशी सूचना आमदार कोकाटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र, तरी देखील या कामाला विरोध करून ते रेंगाळत ठेवण्याचे प्रकार सुरूच आहेत. याकडे संबंधित ठेकेदार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केले आहे. आमदारांनी विचारणा केल्यास थातूरमातूर उत्तरे देऊन अधिकारी वेळकाढूपणा करतात असा आरोप पूर्व भागातील शेतकरी करत आहेत.

ती वाहिनी झाली जुनी

वावी व पाथरे येथील उपकेंद्रांना सध्या सिन्नर येथून वीजपुरवठा होतो. ही वीजवाहिनी दीर्घ अंतराची व जुनाट झाली आहे. त्यामुळे वीजगळतीसह वारंवार बिघाड होण्याचे प्रमाण अधिक आहे. पावसाळी वातावरणात अनेकदा पूर्व भागातील वीजपुरवठा रात्रभर बंद राहिला आहे.

पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी, व्यावसायिकांचे नुकसान होते. त्यामुळे शहा येथून वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास पूर्व भागातील जनतेची वीज समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

"येत्या पंधरा दिवसात शहा येथून वावी उपकेंद्राला वीजपुरवठा जोडण्यात येईल. वाहिनीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी अडचण उद्भवली असेल तिथे काम बंद ठेवून पुढचे व मागचे काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. ठेकेदाराकडून ठरलेल्या मुदतीच्या आत जलदगतीने काम करून घेण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत."

- ऋषिकेश खैरनार, उपअभियंता (महावितरण सिन्नर-२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT