shahu maharaj scholarship  esakal
नाशिक

Shahu Maharaj Scholarship News : शाहू महाराज शिष्यवृत्तीचा परदेशी शिक्षणासाठी आधार

प्रशांत बैरागी -सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचे परदेशातील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत नाही.

त्यासाठी मागासवर्गीय कुटुंबातील ७५ प्रतिभावंत विद्यार्थ्यांना यंदा राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत संधी उपलब्ध होणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.(Shahu Maharaj Scholarship Aadhaar for Study Abroad Nashik News)

या योजनेंतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून, ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी उदारमतवादी राजर्षी शाहू महाराज यांनी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली होती.

त्यामुळे या योजनेस शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे. यंदाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘रोजगार’ या लिंकवरून डाउनलोड करून घ्यावा. परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह समाजकल्याण आयुक्तालय- ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्यावर अर्ज करावेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवासभाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएच.डी.साठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम.डी. व एम.एस. अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी."

- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

AUS vs IND Test: बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका! कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT